Ticker

6/recent/ticker-posts

भयंकर!भरधाव ट्रकची वृद्ध महिलेला धडक;महिला गंभीर जखमी

भयंकर!भरधाव ट्रकची वृद्ध महिलेला धडक; महिला गंभीर जखमी


मुर्तीजापुर प्रतिनिधी: संतोष माने


शहर पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील का राज्यातील पॉईंट चौकात भरधाव ट्रक ने वृद्ध महिलेस जोरदार धडक दिल्याने गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सायंकाळी चार साडेचार वाजता च्या दरम्यान घडली.


प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 25 मार्च 2023 रोजी सायंकाळी चार साडेचार वाजता च्या दरम्यान पंचफुला सुखदेवराव अंभोरे वय 75 राहणार वसंत नगर मुर्तीजापुर ही आपल्या घराकडे जात असताना अमरावती कडून अकोल्याकडे भरधाव जात असलेल्या टी एस 08 यु बी 23 65 ट्रक चालकाने जबर धडक दिल्याचा अपघात झाल्याने वृद्ध महिला गंभीररित्या जखमी झाली.व महिलेला तात्काळ अकोला रुग्णालयात रवाना करण्यात आले.नागरिकांच्या जमावाने रस्त्यावरील वाहने अडविली व पोलीस प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला.शहर पोलिसांनी परिस्थिती हाताळून वाहतूक सुरळीत केली.शहर पोलिसांनी अपघातातील ट्रक ठाण्यात लावून कारवाई सुरू केली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या