मोठ्या उत्साहाने राम जन्मोत्सवाला आरंभ
अकोला
संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र स्वर्गीय बच्चुलालजी अगरवाल यांनी स्थापना केलेल्या मोठ्या राम मंदिरात आज मोठ्या उत्साहाने राम जन्मोत्सव आरंभ झाला असून पंधरा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी संस्थेचे अध्यक्ष सुमन विजय अग्रवाल, विनायक शांडिल्य गुरुजी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण होऊन महाआरतीने सुरुवात झाली.
सतत नऊ दिवस विशेष पूजा अर्चना व रामपंचायतची महाभिषेक अकोल्यातील प्रसिद्ध विधी तज्ञ राजन देशपांडे, शुभदाताई देशपांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
राम जन्मोत्सव निमित्त मंदिरात रोष ई करण्यात आली आहे तर मंदिराला सजावट करून विविध महिला मंडळाच्या उपस्थितीत भजन कीर्तन कार्यक्रम आपला आरंभ झाला आहे. यावेळी वेदपाठी ब्राह्मण राजू मेरेकर शर्मा हेमंत घनश्याम अऔवधानिया शर्मा गिरीश जोशी चंद्रशेखर खडसे अनिल मानधने चंद्रशेखर खडसे मनीष शहा गोपाल अग्रवाल सोनल अग्रवाल आधी उपस्थित होते. अविनाश परांजपे वाणी राम कथा नारदीय कीर्तन आरंभ झाला.
0 टिप्पण्या