अकोला - अकोट महामार्गावरील पूर्णा नदीवर गांधीग्राम गावाजवळ बांधण्यात येत असलेला लहान पूल ५ मार्च २०२३ पूर्वी पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करा बांधकाम विभागाला आमदार सावरकर यांचे निर्देश
अकोला - अकोट महामार्गावरील पूर्णा नदीवर गांधीग्राम गावाजवळ बांधण्यात येत असलेला लहान पूल ५ मार्च २०२३ पूर्वी पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग अकोला तसेच कंत्राटदार यांचे सोबत बैठक घेऊन आमदार रणधीर सावरकर यांनी अशा सूचना दिल्या. कामाला गती द्या यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यासंदर्भात गंभीर यांनी सूचना दिली असून सूचना दिल्या असून मला गती देऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी यासंदर्भात आमदार सावरकर यांना याबाबत अधिकाऱ्यांची संपर्क साधून जनतेला सुविधा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत निर्देश दिले आहे.
व नागरिकांना अकोला - अकोट महामार्गावरील रखडलेले कामाचे संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व कंत्राटदारासोबत आढावा बैठक घेतली.
या मार्गावरील अकोला ते गांधीग्राम मार्गा दरम्यान सात ठिकाणी खंडित असलेल्या रस्त्याचे काम ३० मार्च २०२३ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात यावे तसेच अकोला ते पाचमोरी दरम्यान महामार्गावर रस्ता दुभाजक बांधण्यात यावा तत्पूर्वी मात्र वाहतूक सुरळीत होण्याचे दृष्टीने रस्त्याच्या या लांबी मध्ये दोन्ही बाजूला साईड पट्ट्यांचे काम सुद्धा ३० मार्च २०२३ पूर्वी पूर्णा करण्यात यावे अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या. अकोला - ते अकोट रस्त्याची वाहतूक गोपालखेड मार्गे जात असल्याने गांधीग्राम ते गोपालखेड दरम्यानचा रस्ता प्रचंड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याने गोपालखेड ग्रामस्थांची नाहक निर्माण झालेली अडचण दूर करण्यासाठी तसेच या परिसरातील पानेट येथील महाशिवरात्री यात्रा उत्सवासाठी जाणार्या श्रद्धावान भाविक भक्तांना सुद्धा नाहक अडचणी सामना करावा लागू नये तसेच वाहतूक निर्धोक पणे व्हावी या करिता या मार्गावरील पडलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे अशा सूचना सुद्धा आ. रणधीर सावरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत. व या संदर्भात कामाबाबत अहवाल त्वरित सादर करण्याची सुद्धा निर्देश देण्यात आले आहे व या परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याबाबत बांधकाम विभागाने गांभीर्याने कामाला गती द्यावी
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या