Ticker

6/recent/ticker-posts

कामांची गती वाढवा, खासदारांचे मंत्र्यांना पत्र

कामांची गती वाढवा, खासदारांचे मंत्र्यांना पत्र


अकोला ः शहरातील दोन उड्डाणपुलांसह रेल्वे स्थानकावरील विकास कामांची गती वाढविण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र खासदार संजय धोत्रे यांनी रेल्वे मंत्र्यांना पाठविले आहे.
अकोला शहरातील डाबकी रोड रेल्वे उड्डाणपुलावर गडर टाकल्यानंतर पुढील काम थांबले आहे. त्यासोबतच तीन वर्षांपासून न्यू तापडियानगर रेल्वे उड्डामपुलाचे काम आहे त्याच स्थितीत आहे. त्यामुळे नागरिकंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी प्रस्तावित अनेक कामे अर्धवट स्थितीत आहे. प्लॅटफार्म क्रमांक दोनवर लिफ्ट व स्वयंचलित जीना बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यासोबत प्लॅटफार्म क्रमांक तीन व चार हे मध्य रेल्वेच्या मार्गावर जोडण्याचे कामही सुरू करण्यात आले नाही. अकोला रेल्वे स्थानक हे देशातील मॉडल रेल्वे स्थानकांच्या यादीत आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात निधीची तरतुदही करण्यात आली आहे. त्यामुळे अकोला रेल्वे स्थानकावरील या सर्व कामांची गती वाढविण्याची मागणी खासदार संजय धोत्रे यांनी रेल्वे मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या