अकोला ब्रेकिंग- SBI बँकेचे ATM फोडले, लाखाची रक्कम लंपास
गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडल्याचा अंदाज प्राथमीक अंदाज
खदान पोलिसांतर्गत येणाऱ्या केशव नगरजवळील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएमला अज्ञात आरोपींनी लक्ष्य केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रात्रीच्या सुमारस केशव स्थित रिंग रोड वरील SBI बँकेचे ATM अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली. एटीएम मशीनमधून 16 लाखांची रक्कम पार केल्याची माहिती आहै! गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडल्याचा अंदाज प्राथमीक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामधून 16 लाख 54 हजाराची रक्कम लंपास केली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक, शहर पोलिस उपअधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, खदान पोलिस ठाण्याचे निरीक्षक, डीबीचे कर्मचारी सक्रियपणे गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.
0 टिप्पण्या