जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथील वॉर्ड क्रमांक 3, 5, 8 व 6 चे नूतनीकरण करणे करिता एकूण 4 कोटी 81 लक्ष रुपये रुपये निधी मंजूर.
मा. खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री ॲड. श्री संजयभाऊ धोत्रे, भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष मा.आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय अभ्यागत समिती अध्यक्ष मा.आमदार श्री हरिषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांच्या पाठपुराव्याने माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अकोला मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथील वॉर्ड क्रमांक 3, 5, 8 व 6 चे नूतनीकरण करणे करिता एकूण 4 कोटी 81 लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे. लवकर सदर कामाला सुरुवात होणार असून अकोला जिल्ह्यातील रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीने याचा निश्चितच खूप मोठा फायदा होणार आहे असे जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला अभ्यागत समिती अध्यक्ष माननीय आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या