Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक..!अज्ञात जनावर दुचाकीच्या आडवा आल्याने 42 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू..

धक्कादायक..!अज्ञात जनावर दुचाकीच्या आडवा आल्याने 42 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू..


मुर्तीजापुर प्रतिनिधी: संतोष माने


मुर्तीजापुर तालुक्यातील दुर्देवी घटना रस्त्यात अज्ञात जनावर आडवा आल्याने अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मुर्तीजापुर शहरातील सोनाळा पळसोडा रोडवरील नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन जवळ घडली.निलेश प्रभाकर ढोरे (वय 42) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, निलेश ढोरे हे मुर्तीजापुर येथील घरून रात्री 9:30 च्या सुमारास दुचाकी वरून शेतात पाणी देण्यासाठी (एमएच 30 एडी 7236) जात होते.सोनाळा परसोडा रोडवरील घणकचरा व्यवस्थापनच्या गेट जवळ त्यांच्या वाहनासमोर अज्ञात जनावर आडवा आल्याने ते रस्यावर फेकले गेले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी 6 वर्षाची एक मुलगी 3 वर्षाचा एक मुलगा व आई वडील असा आप्त परिवार आहे.याबाबत मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.सदर घटनेचा पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोहर वानखडे व पोलीस कॉन्स्टेबल नामदेव आडे करीत आहे.सदर घटनेमुळे सोनाळा व मुर्तीजापुर नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मुर्तीजापुर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणात थैमान घातला आहे. आता जनावरांमुळे 42 वर्षीय निलेश ढोरे यांना आपला जीव गमवावा लागला आहे.घनकचरा व्यवस्थापन केंद्राजवळ मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात आहे असे जनसामान्यातून बोलल्या जात होते.त्यामुळे सोनाळा येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या