अकोला जिल्ह्यातील पहीली बालस्नेही शाळा होणार धोतर्डी जिल्हा परिषद शाळा - ऊत्थान फाऊंडेशनचा उपक्रम
ग्रामीण विकास विभागामार्फत शाश्वत गाव विकास आराखडे बनविल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणुन ग्रामीण विकासाला चालणा देतांना महीला व बालकांचा पण सन्मानपुर्वक विकास होणे गरजेचे राहते याच ऊद्देशाने विकासाच्या नऊ तत्वा पैकी एक असलैले तत्व म्हणजे बालस्नेही गाव असणे महत्वाचे असते .ज्या मुळे ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित , पोषक व आरोग्यदायी वातावणात उत्तम दर्जाचे शिक्षण व पोषण मिळाल्यास गावाचा विकास करतांना लहान मुलं मुली देखील निरोगी , सुदृढ व उच्चशिक्षीत बनतील यामुळे नक्कीच गावाचा विकास होईल व पुढे जावुन गावाला मोठ्याप्रमाणात सक्षम पिढी मिळेल . या अनुषंगाने आज अकोला तालुक्यातील धोतर्डी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधे क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंती व बालिका दिना निमीत्त शालेय व्यस्थापण समीती तथा शाळेव्दारा आयोजीत कार्तक्रमामधे ऊत्थान फाऊंडेशनव्दारा अकोला जिल्हातील पहीली बालस्नेही शाळा बनविण्याचा निर्धार केला .
यावेळी ३ जानेवारी बालिकादिना पासुन ते ८ मार्च महिला दिना पर्यत बालस्नेही शाळा अभियान राबविण्याचा संकल्प केला . या मधे शाळेमधील विद्यार्थी विशेषत: मुली करीता सुरक्षीत व निर्भीड वातावरण , आरोग्य विषयक माहीती, पोषण आहार ,वैयक्तीक स्वच्छता , शालेय स्वच्छाता , बाल संसद/ बालसभा , सृदृढ विद्यार्थी सुदृढ शाळा , शालेय परीसर परसबाग , आंगणवाडी परीसर , मुलींकरीता स्वच्छ मुतारी व शौचालय , स्वच्छ किचनशेड , स्वच्छ व पुरेसे शालेय परीसरामधेच पाण्याची व्यवस्था अश्या विवीध विषयावर कामे केली जाणार ह्या सर्व बाबींची नोदी शाळा व शालेय व्यवस्थापण समीतीकडे नोदणी रजिस्टर मधे नियमीत घेतली जाईल . मुलींना भयमुक्त वातावरण मिळावे या करीता मुलींची "साविञी बालस्नेही शालेय समीती" राहील . या मधे काही विद्यार्धी मुले देखील समीती मधे राहतील .ही समीती सर्व बाबीवर लक्ष ठेवेल .या अभियानाचा मुख्य उद्देश बालकांच्या , मुलींच्या दृष्टीने पोषक वातावरण गावात निर्णाण करणे व पुढची पिढी सक्षम व सशक्त करणे हीच असेल . सदरील कार्यक्रमाला गावचे सरपंच रामेश्वर गोहाडे , उपसरपंच राजेश गायगोळ , केद्रप्रमुख नीतीन बंडेवार, मुख्याध्यापक शेख जमील, शाळा व्यवस्थापण समीती अध्यक्ष राजेश बिल्लेवार , शालेय व्यवस्थापन समीती उपाध्यक्ष शुक्लोधन वानख़डे तथा ऊत्थान फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण इंगळे , शुक्लोधन वानख़डे , संघपाल वाहुरवाघ व सहाय्क शिक्षीका उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या