Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य सहायिका यांना पहिल्यांदा मिळाले महिला विस्तार अधिकारी पद

आरोग्य सहायिका यांना पहिल्यांदा मिळाले महिला विस्तार अधिकारी पद 


अकोला जिल्ह्यातील आरोग्य सहायिका यांना पहिल्यांदा मिळाले महिला विस्तार अधिकारी पद प्रमोशन मागील वर्षी 25 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले व या आंदोलनात मुख्य मागणी ठेवून 2012 पासून 33 टक्के राखीव असलेली शासन निर्णय असून सुद्धा महिला विस्तार अधिकारी पद प्रमोशन करीता खूप मोठा पाठपुरावा व खूप मोठा संघर्ष या पदाकरिता अकोला जिल्हा परिषद येथील नर्सेस संघटनेच्या वतीने घडून आणला पाठपुरावा करत असताना माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्यात आले तसेच अकोला पालकमंत्री बच्चू कडू महोदय यांना सुद्धा निवेदन देण्यात आले तसेच अकोला जिल्ह्यातील तडफदार नामदार आमदार श्री नितीन बापू देशमुख महोदय यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आले तसेच, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने माझी आरोग्य सभापती तथा उपाध्यक्ष सावित्री राठोड यांच्याकडून सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा करत असून शेवटी आज रोजी02 जानेवारी 2023 अकोला जिल्हा परिषद मध्ये महिला विस्तार अधिकारी पद प्रमोशन 33 टक्क्यांनी तीन स्वास्थ अभियंता ह्या, महिला विस्तार अधिकारी पद प्रभूषण घेत आहेत व एकूण19 आरोग्य सेविका ह्या संस्था अभियंता पद प्रमोशन ग्रहण करत आहेत करिता महाराष्ट्र जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष संगीता जाधव यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा आरोग्य सभापती आदरणीय संगीता आढाव मॅडम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ फाटकर, जिल्हा परिषद शासन प्रशासन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार तसेच HOD माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले व आरोग्य सभापती श्रीमती सावित्री राठोड, डॉक्टर विजय जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत पवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले. गेल्या एका वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून संघटनात्मक लढा देणे व पाठपुरावा करणे चालू होता, अखेर आज 02 जानेवारी 2023 रोजी हा आनंदाचा क्षण आला, तब्बल बारा वर्षानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त अकोला जिल्हा परिषद येथे पहिल्यांदा महिला विस्तार अधिकारी शासन शासन निर्णयानुसार 33 टक्क्यांनी राखीव असलेले महिला विस्तार अधिकारी पद प्रमोशन येथे मिळत आहे.



यामध्ये 33 टक्के नुसार तीन आरोग्य स्वास्थ अभियंता ह्या महिला विस्तार अधिकारी पद प्रमोशन पदग्रहण आज करण्यात आले. तसेच तब्बल 19 आरोग्य सेविका या स्वास्थ अभियंता पदग्रहण, पुरुष आरोग्य कर्मचारी एकूण 16 आरोग्य सेवक या पदावरून आरोग्य सहाय्यक या पदावर पद प्रमोशन घेत आहेत व आरोग्य सहाय्यक या पदावरून पुरुष आरोग्य विस्तार अधिकारी पद प्रमोशन घेत आहेत.गेल्या एका वर्षापासून जी आंदोलनामधली मुख्य मागणीला आज यश मिळाले आहे. 
तसेच सेवेत कायम प्रस्ताव हिंदी भाषा मराठी सुट प्रस्ताव आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हि सुद्धा संघटनेच्या आंदोलनामधील मुख्य मागण्या असून त्या सुद्धा अकोला जिल्हा परिषद शासन प्रशासन यांनी मार्गी लावल्यात त्याविषयी सुद्धा संपूर्ण अकोला जिल्ह्यातील नर्सेस भगिनींच्या वतीने जिल्हाध्यक्ष संगीता जाधव यांनी आभार मानले.


असेच आमच्या नर्सेस भगिनींचे वेळोवेळी हक्क व अधिकार पूर्ण व्हावेत ही अपेक्षा सुद्धा दर्शवीत असताना जिल्हाध्यक्ष संगीता जाधव यांनी आभार मानून दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद अकोला येथील वार्षिक कार्यप्रणाली हि वेळोवेळी दर महिना व दर सहा महिन्यांनी अपेक्षित आहे ती अशाच प्रकारे वेळेच्या आत घडून यावी. ही सुद्धा अपेक्षा संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली तसेच, जिल्हा परिषद नर्सेस संघटनेचा खरोखर आज त्यांनी हक्क व अधिकार मिळालेत अशी दर्शवून पुन्हा एकदा सर्वांचे आभार जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या धडाडीच्या पदाधिकारी ज्योति रोटे सचिव जया काळे उपाध्यक्ष सविता केदार कार्याध्यक्ष शुभांगी फुसे कोषाध्यक्ष यांचा सुद्धा अतिशय मोलाचा व सिंहाचा वाटा या संघटनेच्या लढाईमध्ये व चळवळीमध्ये त्यामुळे जिल्हाध्यक्ष संगीता जाधव यांनी यांचे सुद्धा आभार मानलेत


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या