गट ग्रामपंचायत कौलखेड गोमासे गोनापुर नवनियुक्त सरपंच यांचे गावकऱ्यांनी केले स्वागत
गट ग्रामपंचायत कौलखेड गोमासे गोनापुर येथील सर्व मतदार यांच्या नेतृत्वात कौलखेड गोमासे येथील सरपंच पदाचे उमेदवार सौ. सोनाली अनिल गोमासे यांचा ३५ मतांनी दणदणीत विजय झाला तसेच एकुण पाच सदसय सुकेशिनिताई संघपाल उमाळे, शिल्पाताई सुभाष उमाळे,नंदाताई देवशिंघ सोळंके,घनश्याम भाऊ बोडदे,सुवर्णा राजेश इंगळे, यांना विजय प्राप्त झाला. या विजयाचे श्रेय सर्व मतदार गोनापूर, कौलखेड गोमासे यांना देण्यात आला. हा सामान्य माणसाच्या हातून समाजासाठी निवडलेला एक निःस्वार्थ समाज कार्यात सदैव तत्पर असणाऱ्या व्यक्तिंचा विजय आहे. यांसाठी सर्व गावकरी मंडळी एकजुटीने प्रयत्न करून त्यांना विजयी मिरवणूक दिला.
या यशाचे श्रेय सर्व गावकरी यांना देण्यात येते ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपापल्या परीने मदत करून विजय श्री खेचून आणला. पुढील वाटचालीस अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला तर्फे विजयी उमेदवार चे हार्दिक अभिनंदन देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. अशी माहीती अखिल भारतीय मराठा महासंघ सोशल मीडिया अकोला जिल्हाध्यक्ष सचिन पाटील गोमासे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या