Ticker

6/recent/ticker-posts

विजय मालोकार यांचा आज भाजपमध्ये प्रवेश

विजय मालोकार यांचा आज भाजपमध्ये प्रवेश 



अकोला- शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा एसटी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष व अकोला जिल्ह्यातील विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले लोकप्रिय नेतृत्व विजय मालोकार हे रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेत आहेत.
     भारतीय जनता पक्षाचे कार्यालयात डॉ. टोपले सभागृहात हा पक्ष प्रवेश समारंभ रविवारी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. विजय मालोकार यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर ते आता कोणत्या पक्षात जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला असून रविवारी सकाळी ते भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या