ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना १० टक्के आरक्षणातून परिचर पदावर केले अपात्र
----------------------------------------
जिल्हा परिषद प्रशासनाकडून अन्याय करण्यात आल्याचा आरोप
---------------------------------------
जि. प.कार्यालयासमोर ५ डिसेंबर रोजी तीन कर्मचारी व कुटुंबीयांचे आमरण उपोषण
----------------------------------------
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार जिल्हा परिषद वर्ग ४ परिचर पदासाठी पात्र असताना अकोला जिल्हा परिषद प्रशासनाने अपात्र ठरविले. मूर्तीजापूर तालुक्यातील सांगवी ग्रा पं कर्मचारी संतोष एकनाथ माहुलकर , सोनोरी ( बपोरी) हरिहर अजाबराव खरड व बाळापूर तालुक्यातील नागद येथील अशोक वासुदेव बोरवार हे तीनही कर्मचारी सेवाजेष्ठते नुसार १० टक्के आरक्षणाअंतर्गत पात्र असताना यांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून नवीन भरतीत अपात्र ठरविण्यात आले .
जि.प. अकोला ग्रा.पं. कर्मचारी सेवाजेष्ठता यादी सन २०१९ , २०२० व २०२१ या मधे जि.प. चे वर्ग ४ परिचर पदाकरिता पात्र असतांना जिल्हा परिषद अकोला यांनी तीन कर्मचाऱ्यांना अपात्र करुन सेवेपासून डावलले आणि त्यांच्या पेक्षा सेवाजेष्ठतेने कमी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली. हा कर्मचाऱ्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर अन्याय केलेला आहे.
याबाबत स्वतः व संघटनेने वारंवार पाठपुरावा करुनही तसेच जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हा परिषद पुणे येथील परिचर पदभरतीचे पुरावे सादर करुनही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे अपात्र ठरविण्यात आलेले तिनही कर्मचारी कुटुंबीयासह सोमवार ५ डिसेंबर रोजी पासुन अकोला जिल्हा परिषद समोर आमरण उपोषणास बसणार आहोत.
संबंधीत अधिकाऱ्यांनी ५ डिसेंबर पुर्वी तिघांना परिचर पदावर नियुक्ती देण्यात यावी , अन्यथा न्याय न मिळाल्यास नाईलाजाने तीनही कर्मचारी व कुटूंबिय उपोषणास बसणार आहे . होणाऱ्या परिणामास जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील असे सही निशी निवेदनात नमूद आहे .
या निवेदनाच्या प्रती ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव , जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक , संघटनेचे राज्याध्यक्ष तथा सरचिटणीस व इतर ठिकाणी देण्यात आल्या आहे .
---------------------------------------
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या