व्हाट्सअप स्टेटस ठेव युवकाची रेल्वे ट्रॅक वर आत्महत्या
व्हाटस अॅप च्या स्टेटसवर झुठा प्यार था तेरा असे स्टेटस ठेवत बाभुळगावच्या अक्षय ने धावत्या रेल्वे समोर झोकून देत आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येने गावात चांगलीच खळबळ माजली आहे.
यावलखेड रेल्वे स्टेशन परिसरात बाभुळगाव येथील रहिवासी असलेल्या अक्षय गणेश शिरसाट या २४ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अतिशय हसतमुख व्यक्तिमत्व असलेल्या अक्षय याच्या आत्महत्येने त्यांच्या मित्रांबरोबर घरच्यांना चांगलाच धक्का बसला आहे. अक्षयने रात्री १२.३० वा. "झुठा प्यार था तेरा" आशयाचे व्हाट्स अॅप स्टेटस मध्ये ठेवले होते. त्यानंतर त्याने धावत्या रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली. त्याचे दोन्ही पाय कापल्या गेल्या आहेत व डोक्याला मार आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात बोरगावमंजु पोलिस तपास करीत आहेत.
0 टिप्पण्या