Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा, दिग्गज गावपुढाऱ्यांचा दारुण पराभव

ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा, दिग्गज गावपुढाऱ्यांचा दारुण पराभव



जिल्ह्यातील २६५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. यावेळी सरासरी ८१.५ टक्के मतदान झाले असून आज सातही तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी थेट सरपंच पदाची निवडणूक जनतेतून होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी उडी घेतली होती. निवडणूकीत दिग्गज गाव पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र बघावयास मिळाले होते. आज झालेल्या मतमोजणी मध्ये दुपारपर्यंत हाती लागलेल्या निकालात अनेक दिग्गजांचा वार पराभव झाल्याचे स्पष्ट झाले. आज मतमोजणी दरम्यान आपल्या गावचे कारभारी ठरले म्हणत गावकर्‍यांनी निश्वास सोडला. ग्रामपंचायत निवडणुकीत टप्प्या टप्याने निकाल हाती येत होते. निकाल घोषीत करण्याविषयीचे कुठलेही नियोजन जिल्हा प्रशासनाचे नव्हते. एक एक निकाल हाती येत गेले. काही ठिकाणी गुलाल उधळीत तर काही ठिकाणी निळ उधळीत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.  जिल्हात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक २६५ जागेसाठी मतदान पार पडले. जिल्ह्यातील सात तालुक्यात मतमोजणीत ८२ टेबलावर २७८ कर्मचान्यांच्या मदतीने मतमोजणी पार पडली.


वंचित चा केलेला दावा खरा ठरला- 

दरम्यान, ग्रामपंचायतचे निकाल हाती आले आहेत, त्यामधे वंचित बहुजन आघाडी ने बाजी मारली आहे. अकोला जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच वंचित ने आपल्या पक्षाच्या बॅनर खाली सरपंच पदाचे उमेदवार लढवीले. 
त्यावर भाजपाचा दावा करणे की आमच्याच जागा जास्त आल्या असे चुकीचे ठरेल. आधी भाजपने आपल्या पक्षाचे उमेदवार जिंकले हे ठामपणे सांगावे त्यानंतरच दावा करावा असा टोला प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात भाजप दिला आहे।
वंचीतचा जिल्ह्यात 50 टक्के पर्यंत जिंकणारे उमेदवार जाणार असल्याचा दावा खरा ठरवीत तब्बल 80 जागेवर ताबा मिळविला आहे. तर वंचीत बंडखोर उमेदवारांनी 45 जागा जिंकल्या आहेत. भाजपा पक्षाच्या 62, शिवसेना ठाकरे गटाच्या 40, काँग्रेस व राष्ट्रवादीत काँग्रेस प्रत्यकी 3, मनसे 1 तर प्रहार 2 जागा जिंकून, अपक्ष व इतर मिळून 30 उमेदवार निवडून आली आहेत. त्यामुळे वंचीत बहुजन आघाडीचे ऐड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेला दावा खरा ठरला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या