एमआयडीसी येथील सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या निषेधार्थ निवेदन
स्टेडियम ऍग्रो इंडस्ट्रीज कोटा येथील कार्यरत कर्मचारी सुरक्षारक्षक सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीतील असून त्यांना कुठलेही कारण नसताना, सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले. त्यांच्याजवळून दबाव यंत्राच्या साह्याने राजीनामा व धमकी दऊन कर्मचारी टप्प्याटप्प्याने कामावरून कमी केल्या जात असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांना 400/- रुपये रोज मजुरी दिल्या जाते, परंतु नियमानुसार ती 800/- रुपये असल्याचे यावेळी आरोप करण्यात आला. अशी एकूण या कंपनीमध्ये 43 कर्मचारी असून आतापर्यंत नऊ ते दहा कर्मचारी कमी करण्यात आली आहेत. ASO चंद्रभान इंगळे, एरिया ऑफिसर निलेश सिंग यांच्या दबाव तंत्रामुळे या सर्व कर्मचाऱ्यांचे घरवर उपाशी मरण्याची वेळ आली आहे.
बाहेरगावी स्थलांतरित करून जिल्ह्याबाहेरील कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये नवीन नियुक्ती देण्यात येत आहे, ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना बाहेरगावी न पाठविता इथेच कामावर रुजू करून घ्यावे अशी विनंती सम्राट अशोक सेने तर्फे अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदनातून देण्यात आली. याप्रसंगी कर्मचारी गजानन कोथळकर, योगेश इंगळे, सिद्धांत चक्रे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या