Ticker

6/recent/ticker-posts

अल्पसंख्यांक योजनेअंतर्गत प्रीमॅट्रिक स्कॉलरशिप अर्ज रद्द न करणे बाबत शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन

अल्पसंख्यांक योजनेअंतर्गत प्रीमॅट्रिक स्कॉलरशिप अर्ज रद्द न करणे बाबत शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन


औरंगाबाद - 30/11/2022
राज्यातील जवळपास दहा लाख अल्पसंख्यांक योजनेअंतर्गत येणाऱ्या मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शिख धर्मातील पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती फार्म भरून घेण्यात आले आहेत परंतु शासन स्तरावर ते अमान्य करून रद्द करण्यात आले आहेत. अल्पसंख्याक समाज आर्थिक विकृतीमुळे मागासलेला आहे, त्यामुळे तेथील मुलांना शिक्षण मिळत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली होती, मात्र ती बंद करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला असून, त्यामुळे मुलांचा शिक्षण घेण्याचा उत्साह संपुष्टात येईल आणि जोपासला जाईल. 


शैक्षणिक खर्चामुळे मुलाला शाळेत पाठवले जात नाही, त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील मुले शिक्षणापासून दूर राहू शकतात. अर्ज भरलेल्या पालकांनी कागदपत्रे तयार करण्यासाठी खूप पैसा खर्च केला आणि अचानक केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने सर्व पालकांची विशेषतः मुलांची निराशा झाली आहे. त्यामुळे हा आदेश मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अल्पसंख्यांकावर अन्याय होत असून त्वरित शासनाने अल्पसंख्यांक योजनेअंतर्गत प्रीमॅट्रिक स्कॉलरशिप अर्ज रद्द न करावेत. व योग्य ते कारवाई करून सहकार्य करावे.असे भारतीय ऑल ऑल मीडिया सुरक्षा फॉर्म ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रफिक शेरखान यांच्या मार्गदर्शनात युथ विभाग चे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मिर्झा नदीम बेग यांनी प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षण अधिकारी औरंगाबाद यांना निवेदन दिले.त्यावेळी  
भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाचे युथ विभाग चे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मिर्झा नदीम बेग,जियाशेख औरंगाबाद युथ विभाग जिल्हाध्यक्ष,मुजमिल शेख,मुस्तफा शेख जिल्हाध्यक्ष कामगार विभाग,आदेश गरगडे,पैठण युथ विभाग तालुकाध्यक्ष, काजी कवीयोद्दीन महानगर शहराध्यक्ष युथ विभाग,समाजसेवक आयान शेख व भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तथा शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते...


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या