मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधामधील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश
मान. नाम. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची मान. गौतम सोनवणे, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) यांनी मंत्रालयात भेट घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एका निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की, पुण्याचे पालकमंत्री मान. नाम. चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केले होते या विधानातील शब्दामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संताप निर्माण झाला. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मान. नाम. मुख्यमंत्र्यांना काल या निवेदनातून मागणी केलेली आहे, की हा गंभीर विषय ताबडतोब संपवण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यावरील पोलिसांनी नोंदवलेले आयपीसी कलम 307, 120 ब व 353 सारखे गंभीर गुन्हे रद्द करून या वादावर कायमचा पडदा टाकण्यासाठी योग्य पाऊल उचलावे यावर मान.नाम. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि रिपब्लिकन पक्षाच्या या शिष्टमंडळास आश्वासन दिले की, पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांवरील हे गंभीर गुन्हे ताबडतोब काढण्यात येतील व या जे कार्यकर्ते पोलीस कोठडीत आहेत त्यांनाही उद्या निश्चितपणे सोडण्यात येईल असं सागीतले व आज सोडण्यात आले. मान.नाम. मुख्यमंत्र्यांनी रिपबलिकन पक्षाला आज दिलेले आश्वासन पाळले त्याबद्दल मान.नाम. मुख्यमंत्र्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत अभिनंदन केले. अशि माहीती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी कळवीली आहे.
0 टिप्पण्या