भारतीय संविधान जनजागरण प्रचार रॅली आज अकोल्यात दाखल
भारतीय संविधान जनजागरण प्रचार रॅली आज अकोल्यात सम्राट अशोक वाटिका येथे दाखल झाली. यावेळी विविध संघटनांनी या रॅलीच्या प्रचारार्थ भारतीय संविधान जन जागरण प्रचार रॅलीला भेट देऊन समर्थन दिले. या संविधान जनजागरण रॅलीची 21 ऑक्टोबर 2022 रोजी महाड क्रांती भूमी येथून सुरुवात झाली आणि रॅलीचा समारोप 26 नोव्हेंबर 2022 रोजी नागपूर दीक्षाभूमी येथे होणार असून, आज या संविधान जनजागरण प्रचार रॅलीचा अकोला येथील सम्राट अशोक वाटिका येथे प्रचार कार्यक्रम पार पडला. यावेळी अकोला जिल्ह्यातील अशोक वाटिका येथे या सविधान रॅलीचे आगमन झाले असता सम्राट अशोक सेनेच्या वतीने व अशोक वाटिका प्रेरणाभूमी संघ यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले, यावेळेस संविधानाचे गाढे अभ्यासक अनंत भवरे सर, औरंगाबाद यांनी संविधानाचे महत्त्व सर्वांना सांगितले सविधान कशा पद्धतीने घरोघरी पोहोचवणार असे मोलाचे मार्गदर्शन केले तरी त्यांच्या संविधान रॅलीच्या स्वागत करण्यासाठी समस्त उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. सम्राट अशोक सेनेच्या वतीने त्यांना संविधान उद्देश पत्रिका म्हणून भेट देण्यात आली व पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
भारतीय स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रथमच महाराष्ट्रात भारतीय संविधान जनजागरण प्रचार रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये संविधान जनजागरण रथ आकर्षक ठरला. जातीधर्माच्या, वंश भेदाच्या, वर्णभेदाच्या, लिंगभेदाच्या, धर्म भेद अशा विविध प्रकारच्या भेदांच्या भिंती भेदून सदसद विवेक बुद्धीला जागृत करण्यासाठी भारतीय संविधान जनजागरण प्रचार रॅली काढण्यात आली आहे. गेल्या 70 वर्षात स्वतंत्र, समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्ष, सार्वभौमत्व लोकशाही मूल्यांचा अविष्कार भारतीय जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश घेऊन ही प्रचार रॅली निघाली आहे. आजची राजकीय परिस्थिती देशांमध्ये बिकट असून देशात जागतिक संकट निर्माण होण्याचे संकेत मिळत असल्यामुळे आपली परिस्थिती रशिया - युक्रेन सारख्या परिस्थितीला भारतीय नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याचे चिन्ह दिसत असल्यामुळेच भारतीय संविधान जागरण प्रचार रॅलो काढण्यात आल्याचे यावेळी आयोजक जीवन मुक्ती सोशल फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सांगण्यात आले. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक सहभागी होते, पुढे ही रॅली यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भारतीय संविधान जनजागरण प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या