अखेर अकोला अकोट रेल्वे सुरू करण्याचा मुहूर्त ठरला
अकोला-अकोट-अकोला रेल्वे शटल सेवा सुरू करण्याच्या अकोला जिल्ह्याचे पालक मंत्री तथा राज्याचे उप मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची हिरवी झेंडी मिळाली असून रेल्वे सेवा प्रत्यक्ष सुरु करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नोटिफिकेशन जारी केले आहे.
अकोला – अकोट दरम्यान रेल्वे शटल सेवा बुधवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी अकोला रेल्वे स्थानकावरून सुरु होणार असून केंद्रीय रेल्वे मंत्री ना. अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना रावसाहेब दानवे तसेच जिल्ह्याचे पालक मंत्री तथा उपमुख्य मंत्री ना देवेंद्र फडणवीस हे सुदूर यंत्रणे द्वारे या कार्यक्रमास ओन लाईन द्वारे उपस्थित राहून हिरवी झेंडी दाखविणार आहेत. अकोला अकोट महामार्गावरील गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरील पूल खचल्यामुळे या पुलावरून वाहतूक बंद करण्यात येऊन पर्यायी मार्ग जरी उपलब्ध करून दिले असले तरी सदरचे पर्यायी मार्ग नागरिकांना वाहतुकीसाठी अत्यंत गैरसोयीचे होते त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा आणि नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठा खोळंबा निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोला-अकोट दरम्यान रेल्वे शटल सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उप मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचे सोबत प्रदेश भाजपा सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांनी दिल्ली व मुंबई येथे सतत पाठपुरावा केला. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आ. प्रकाश भारसाकळे, आ. गोवर्धन शर्मा आ. हरीश पिंपळे, आ. वसंत खंडेलवाल यांनी मा. ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शटल रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी गळ घातली. या बाबतचे प्रयत्नांना अनुसुरून नांदेड येथील जी. विद्याधर , डी.ओ.एम यांनी शटल रेल्वे सेवा सुरु करण्याच्या कामी असलेल्या सर्व संबंधितांना त्यांचे आदेश क्रमांक NTAK-AKOT/TF/PO /04/10/01 दिनांक ०४.११.२०२२ चे आदेशानुसार रेल्वे मार्गाचे निरक्षण करण्याचे निर्गमित केलेले होते. डी.ओ.एम यांचे आदेशानुसार विद्युत विभाग, यांत्रिकी विभाग, ट्रॅक फिटनेस अॅश्युरन्सशी इत्यादी बाबींची तपासणी व खात्री केल्यानंतर अकोला-अकोट-अकोला रेल्वे शटल सेवा सुरु करण्यातील सर्व अडथळे दूर होऊन अकोला-अकोट दरम्यान रेल्वे शटल सेवा सुरु करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय भारत सरकार यांनी सी.सी.नं. २११/२०२२ दिनांक १८ नोव्हेंबर नुसार नोटिफिकेशन जारी करण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरु करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. अकोला-अकोट दरम्यान अकोला येथून सकाळी ६ वाजता व सायंकाळी ६ वाजता अकोट कडे मार्गस्त होणार असून अकोट येथून अकोला कडे सकाळी ८.०० व रात्री ८ वाजता मार्गस्त होणार आहे. अकोला –अकोट रेल्वे मार्गावर उगवे, गांधीस्मारक रोड व पाटसूल हे तीन थांबे देण्यात आले आहेत.
अकोला – अकोट शटल सेवा सुरु होत असल्याने या मार्गावरील तसेच अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला असून केंद्रीय रेल्वे मंत्रीना. वैष्णव, राज्याचे उप मुख्य मंत्री व अकोला जिल्हा पालक मंत्री ना.देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री ना रावसाहेब दानवे, माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे, यांच्या सर्वांच्या फलनिष्पतते पोटी सुरु होत असलेल्या अकोला-अकोट-अकोला शटल सेवे पोटी आनंद व्यक्त करून सर्वांप्रती आभार व्यक्त केले आहेत
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या