Ticker

6/recent/ticker-posts

मानव सेवा फाऊंडेशन आकोला व्दारा अन्नदान वितरण संपन्न

मानव सेवा फाऊंडेशन आकोला व्दारा अन्नदान वितरण संपन्न 
 

हा संकल्प घेऊन नोव्हेंबर 2018 पासुन म्हणजे आज 4वर्षे पुर्ण होऊन 5व्या वर्षांत मंडळ पदार्पण करीत .मंडळ प्रत्येक शनिवारी जिल्हा शासकीय स्त्री रूग्णालय ( लेडी हार्डिंग हॉस्पिटल )आकोला येथे अन्नदान वितरित करत आहे.कारण मंडळानी सर्व परिस्थितीचे निरीक्षण करून जिल्हा शासकीय स्त्री रूग्णालय आकोला येथे खेड्यापाड्यातून आलेले व जास्तीत जास्त गरीब व गरजवंत रूग्णच येथे येतात व त्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन येथे मानव सेवा फाऊंडेशन आकोला च्या वतीने या गरजवंताना अन्नदान रूपाने सेवा करण्याचे ठरवले. त्याचबरोबर बरोबर दरवर्षी नोव्हेंबर / डिसेंबर महिन्यात गरजवंत व उपेक्षित नागरिकांना ब्लँकेट्स पांघरुन देण्यात येत असते. पावसाळ्यात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येतात.


 आज दि. 12 नोव्हेंबर 2022 शनिवार ला शासकीय स्त्री रूग्णालय आकोला येथे झालेल्या अन्नदान वाटप कार्यक्रमात सर्वश्री मुकेशभाऊ ढोके RRC news, श्री योगेश शिरसाट ( Lord Buddha T.V.चे प्रतिनिधि ),राजेशभाऊ धनगावकर, विवेक सातपुते सर संचालक गुरूकुल ACADEMY AKOLA, राहुल खंडाळकर, श्री नविन धोटकर साहेब, श्री सुधिरभाऊ ओहेकर, वसंतराव खोलकुटे, सिध्दोधन भाऊ, इत्यादि सदस्य हजर होते याप्रंसगी श्री धोटकर साहेबांनी मंडळाच्या कार्याचा शब्दरूपी गौरव केला .व स्वता: या उपक्रमास सहभागी होण्याची ग्वाही दिली. राहुल खंडाळकर यांनी गेल्या 4वर्षात मंडळाने केलेल्या कामाचा थोडक्यात सर्व आढावा सांगितला. याप्रसंगी उपस्थितांनचे विवेक सातपुते सर यांनी आभार प्रगट केले. लवकरच या महिण्यात ब्लँकेट्स वाटप करण्यात येतील, याची जाणीव करून दिली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या