Ticker

6/recent/ticker-posts

हिन्दु मुस्लिम एकतेचा संदेश देणारी संदल उत्साहात

हिन्दु मुस्लिम एकतेचा संदेश देणारी संदल उत्साहात 


पंचगव्हाण येथे शाही संदल, विविध जिल्ह्यांतील नागरीकांची उपस्थिती


अकोला 

हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत सय्यद मीर युसूफ अली दादा नेक नाम सरकार यांची शाही संदल मोठ्या थाटामाटात काढण्यात आली. दोन वर्षांच्या लॉकडाऊननंतर सर्व धार्मिक सणांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे बाबांच्या भक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले,



 तेल्हारा तालुक्यातील नरसिंगपूर गावातील पाचगव्हाण येथे दर्गा पंच कमिटीचे अध्यक्ष अब्दुल अजीज नाजा, शेख रफिक शेख तौफिक (रफिकबाबा), जि.प.सदास्य, सैफुल्ला खान, तंटामुक्ती अध्यक्ष गब्बर जमादार, पोलीस पटेल गजानन पाटील, लता पहेलवान यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाजातील धर्मीय बांधवांच्या सहकार्याने शाही संदल काढण्यात आली. यावेळी विविध जिल्ह्यातील हजारो लोक संदलाला उपस्थित होते.गावातील लोकांनी सर्व भाविकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी लंगर (प्रसाद भंडारे) आयोजित केले होते. कुरआनखानी, फातिहाखानी, खैरो बरकत यानंतर सर्व हिंदू मुस्लिम बांधवांच्या शुभेच्छांसाठी प्रार्थना करण्यात आली. किशोर शर्मा (बालाजी) शैलेश खरोटे, अनिस भाई गाझी, अर्जुन पंजवानी, चेतन वर्मा, इनुल्ला खान, लता पहेलवान, सादिक भाई, राजू भाऊ देशमुख यांनी 
 संदल दर्गाह शरीफ येथे रात्री 10 वाजता अतिशय शांततेत अर्पण करण्यात आले, यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या