कामगारांच्या समस्या सोडवून न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार --गणेश ताठे
धन्यवाद मोदीजी, 10 हजार पत्र जमा केले भाजप कार्यालयात
अकोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांच्या हितासाठी विश्वकर्मा योजना तसेच विविध योजना सुरू करून सबका साथ सबका विकास व श्रमजीव चा सन्मान केला आहे त्यामुळे कामगार शेतकरी मातृ शक्ती खंबीरपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभी असून गेल्या आठ वर्षात जनहितार्थ निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद मोदी या अभियानांतर्गत कामगारांचे पत्र घेऊन पंतप्रधानापर्यंत धन्यवाद मोदीजी हा कार्यक्रम राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या पाठीशी गंभीरपणे उभे रहा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष कामगार आघाडी गणेशराव ताठे यांनी केले.
डॉक्टर बाबासाहेब टोपले भाजपा कार्यालय येथे कामगार सेलच्या बैठकीत प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष पश्चिम विदर्भ अध्यक्ष आशीष ढोमणे हे होते तर मंचावर किशोर पाटील शरद पाटील हनुमंत लांडगे चंद्रकांत महाडिक माधव मानकर संजय गोटफोडे देवाशिष काकड, मनोज शाहू आधी प्रामुख्याने विराजमान होते.
अशीष ढोमण यांनी विदर्भ संघटनात्मक बाबीचा आढावा प्रस्तुत करून जिल्ह्यातील कामगार सेल सर्व क्षेत्रातील कामगाराची संपर्क साधून धन्यवाद मोदीजी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात असा विश्वास व्यक्त केला तसेच राज्य व केंद्र सरकारच्या चांगल्या योजना सर्वसामान्य पोहोचवण्यासाठी व त्यांचा लाभ कामगारांना मिळून देण्यासाठी कामगार अशी हमी यावेळी त्यांनी दिली. किशोर पाटील यांनी आमदार रणधीर सावरकर खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल आमदार प्रकाश भारसाकले आमदार हरीश पिंपळे महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असून कामगारांच्या सोडून न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत लांडगे तर आभार प्रदर्शन माधव मानकर यांनी केले यावेळी ग्रामीण व शहरातील कामगार मोठ्या प्रमाणे भाजप कार्यालयात उपस्थित होते यावेळी विविध योजनेची माहिती देण्यात आली तसेच दहा हजार धन्यवाद मोदी जी जिल्हा भाजपाकडे सुपूर्द करण्यात आले.
अकोला - राज्यातील संघटित व असंघटित कामगारांची नोंदणी शुल्क केवळ 1 रुपयां करण्यात आले आहे कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी ज्यांच्याकडे स्वतः ची जागा नाही अश्या कामगारांसाठी 2010 पासून शासकीय जागेत राहणाऱ्या मजुरांना 5 लाख रुपयांपर्यंतचे दिले जाणार आहेत वृध्द पेन्शन योजना मध्ये कामगारांना सहभागी करून घेतले जाणार आहे राज्य शासनाकडे असलेल्या योजना आणि केंद्र सरकारच्या योजना सरळ कामगारांना दिल्या जातात तसेच कामगार हितासाठी स्पेशल समिती नियुक्त करा ही बाब आयुक्तांसोबत बोलून शासनाला ही कळविले जाईल अशी माहिती आज भाजपा कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषदेत दिली
महाराष्ट्र राज्य भाजपा कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे हे गेल्या 30 आक्टोंबरपासून धन्यवाद मोदीजी मोहीम अंतर्गत राज्य दौऱ्यावर असून 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील संघटित व असंघटित कामगार यांच्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने लागू केलेल्या योजनांची आजची स्थिती काय ? कामगारांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबतची स्थिती जाणून घेऊन कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवून ज्या कामगार लाभार्थ्यांनी शासनाची योजना घेतली त्यांच्याकडून धन्यवाद मोदीजी असे पोस्ट कार्ड घेऊन ते जिल्हा भाजप कार्यालयात जमा करण्यात आले आहेत यावेळी त्यांच्या सोबत भाजप कामगार आघाडी पश्चिम विदर्भ विभागीय प्रभारी आशिष ढोमणे,सरचिटणीस हनुमंत लांडगे,शरद पाटील, देवाशीष काकड,चंद्रकांत महाडिक यांची उपस्थिती होती
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या