Ticker

6/recent/ticker-posts

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतुक मार्गात बदल

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतुक मार्गात बदल



अकोला, दि. 11- खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यातून जाणार आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी भारत जोडा यात्रा मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. या संदर्भातील आदेश आज जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.



मालेगाव पासून -मेडशी - पातूर-वाडेगाव- बाळापूर व मालेगाव पासून पातूर मार्गे-अकोला वाशिम बायपास या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक दि. 16 नोव्हेंबर 2022 चे दुपारी ३.00 वाजता पासून ते दि. 18 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी ५.00 वाजेपर्यंत राहील. तसेच, राष्ट्रीयमहा मार्ग क्र. 06 वरील 'पारस फाटा ते शेगाव फाटापर्यंत' च्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक दि. 18 नोव्हेंबर 2022 चे सकाळी 8.00 वाजेपासून ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करुन पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या