Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं; शिवसेना नावाचाही करता येणार नाही वापर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे  यांना  मोठा धक्का! निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं; शिवसेना नावाचाही करता येणार नाही वापर


गेल्या काही दिवसांपासून ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सुरू असलेला वाद तात्पुरता संपुष्टात आला आहे. आज निवडणूक आयोगाचा याबाबत मोठा निर्णय घेत ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व    शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. मात्र, दोन्ही दोन्ही गटाला ठाकरे गट आणि शिंदे गट अशी नावे वापरता येऊ शकतात. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटाला वेगळे चिन्ह देण्यात येईल, असेही निवडणूक आयोगायाने म्हटले आहे.  शिवसेना पक्षामध्ये बऱ्याच दिवसापासून वाद सुरू असल्यामुळे, निवडणूक आयोगासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे  उच्च न्यायालयाने निवडणूक चिन्ह व पक्षाचे नाव यावरील निर्णय निवडणूक आयोग ठरवेल असे जाहीर केल्यानंतर, अंधेरी येथील पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने पक्ष अंतर्गत वाद बघता हा निर्णय जाहीर केला आहे. राजकीय पक्षातील अंतर्गत वाद सोडविण्यासाठी व निवडणूक चिन्ह यावर निर्णय घेण्यासाठी चार ते सहा महिने कालावधी लागू शकतो, त्यामुळे पुढे निवडणूक पाहता निवडणूक आयोगाने कायद्याच्या नियमात राहून हा तात्पुरता निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय दोन्ही गटाला धक्कादायक असल्याचे दिसत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या