Ticker

6/recent/ticker-posts

वाचनाने माणूस समृद्ध होतो.-डॉ.अशोक वाहुरवाघ

वाचनाने माणूस समृद्ध होतो.-डॉ.अशोक वाहुरवाघ 


पिंजर येथील भाऊसाहेब लहाने ज्ञानप्रकाश आर्ट्स कॉलेज मध्ये शनिवार दिनांक 15 ऑक्टोंबर 2022 रोजी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व विद्यापीठ गीताने झाली डॉ.रेखा काळबांडे यांनी प्रास्ताविकातून ग्रंथ प्रदर्शनीचे महत्त्व विशद केले प्रमुख मार्गदर्शक डॉ. अशोक वाहूर वाघ यांनी डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी वाचनापासून दूर न जाता सतत वाचन केले पाहिजे वाचनाने माणूस समृद्ध होतो असे ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले.


 अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ.व्ही.सी. खारोडे यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे विचार भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत असे नमूद केले सदरच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए.के. ठाकरे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ वासुदेव भगत शा. शि. संचालक नानासाहेब सपकाळ मराठी विभाग प्रमुख डॉ. मनोज फडणीस सर तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.पंकज तायडे सर इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. रामकृष्ण गावंडे सर इतिहास विभाग प्रमुख प्रा. सुनील मनोहर सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए. भाग १ ची विद्यार्थिनी कु. भारती ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी श्रुतिका लोणाग्रे हिने केले या कार्यक्रमाकरिता शिक्षकेतर कर्मचारी तसेच श्यामजी खापर्डे संतोषजी गिरी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी ग्रंथालय कर्मचारी तसेच गंगारामजी वानखडे गोपालजी घुमसे नंदू भाऊ विजयेकर उपस्थित होते शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या