अंबिकापूर शेतशिवारात मादक अमली पदार्थ गांजाची 10 लहान झाडे आणि 120 ग्राम गांजा जप्त
आज दि, 15,12,22 रोजी मा पोलीस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मारगदर्शनाखालील विशेष पथकास खात्रीशीर खबर मिळाली की अंबिकापूर शेतशिवारात असलेल्या एका होटेल धाब्यावर गांजाची लहान झाडे लागवड केलेली असून गांजाची विक्री केली जात आहे.
अशा खात्रीशीर खबरेवरून दोन पंचासमक्ष छापा मारला असता त्यांच्या हॉटेल धाब्यावर मादक अमली पदार्थ गांजाची लहान 10 झाडे ज्यांची उंची 1 ते 2 फूट असलेली ज्यांचे वजन 120 ग्राम किंमत 5000 रुपयांचा मुद्देमाल आरोपी रोशन रामणारायन बामन वय 25 वर्ष रा बापूंनगर अकोट फाईल अकोला यांच्या जवळून मिळून आल्याने वरील आरोपी विरुद्ध पो स्टे बोरगाव मंजू येथे NDPS ACT कलम 20ब अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे,
सदर कार्यवाही मा पोलीस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या विशेष पथकाने आज 5 वाजता अंबिकापूर मध्ये केली आहे
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या