Ticker

6/recent/ticker-posts

अकोला पंचायत समिती निवडणूक निकाल जाहीर, दिवाळीपूर्वीच जल्लोषात फोडण्यात आले फटाके

अकोला पंचायत समिती निवडणूक निकाल जाहीर, दिवाळीपूर्वीच जल्लोषात फोडण्यात आले फटाके


अकोला : जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती उपसभापतीपदांची निवडणूक आज रविवार १६ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. सातही पंचायत समित्यांमध्ये विशेष सभा आयोजित केली होती. अकोला पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापतीपदी भाजपा व वंचीत चे दिवाळीपूर्वीच फटाके फुटले आहेत. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतीपदांची निवडणूक जाहीर झाला. 

अकोला पंचायत समितीमध्ये भाजपा वंचितचे दिवाळीपूर्वीच फुटले फटाके

अकोला पंचायत समिति सभापती भाजपा च्या उमेदवार सौ .सुलभाताई सोळंके आणि उपसभापती पदासाठी वंचित चे उमेदवार श्री .अजय भीमराव शेगोकार बिनविरोध निवडून आले आहेत. हा विजय जनतेला व कार्यकर्त्यांना समर्पित केला असून लोकप्रतिनिधी म्हणून जनताच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी व समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी पदाचा वापर करून व समाजातील सर्व घटकांना त्यांचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यरत राहू, असा विश्वास या वेळी देण्यात आला. 


अकोला पालकमंत्री फडणवीसाची अकोट पंचायत समितीत उद्धव ठाकरे गटाला साथ..! सोबतीला काँग्रेस व प्रहार

शिवसेना,भाजपा,प्रहार , काँगेस अकोट पंचायत समितीत सभापतीपदी शिवसेना (ठाकरे गट) हरीदिनी वाघोडे तर उपसभापतीपदी संतोष शिवरकर यांची निवड झाली आहे. अकोट पंचायत समितीत दिड दशकानंतर सत्ता परिवर्तन झाले आहे. त्यामुळे अकोट पंचायत समिती निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांमध्येच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये वंचित व सेनेने मारली बाजी

महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या सौ.आम्रपाली तायडे यांची मुर्तीजापुर पंचायत समिती सभापतीपदी अविरोध निवड. उपसभापती म्हणून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देवाशिष भटकर ९ विरुद्ध ० मतांनी विजयी. शिवसेनेचे दोन सदस्यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे संख्याबळ नऊ झाले.तर महाविकास आघाडीकडे संख्याबळ ५ राहिले होते.९ विरुद्ध ५ अशी एकूण परिस्थिती झाल्यामुळे महाविकास आघाडीतर्फे सभापती पदाकरिता अर्ज दाखल करण्यात आला नाही.


पातुर पंचायत समितीचा निर्णय ईश्वर चिट्ठीने

पातूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक झाली, या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) व वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांचे सदस्य संख्या बळ 6 6 असे सारखेच - असल्याने सदर निवडणुकीचा निर्णय ईश्वर चिट्ठीने घेण्याचे ठरविल्या गेले. पातूर शहरातील दोन चिमुकल्यांनी ईश्वर चिठ्ठी काढून सभापती व उपसभापती ही दोनही पदे वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात पडल्याने शिवसेनेच्या (ठाकरे गट) मनीषा ढोणे व गोपाल भगवान ढोरे यांचा पराभव झाला असून वंचित बहुजन आघाडीच्या सविता अर्जुन टप्पे सभापती तर इमरान खान यांची उपसभापती म्हणून निवड झाली असून पातूर पंचायत समितीवर वंचितचा झेंडा फडकला.


 बार्शीटाकळी येथे सभापतीपदी सुनंदाताई संजय मानतकर उपसभापती संजय चौधरी यांची निवड करण्यात आली. हा विजय जनतेला व कार्यकर्त्यांना समर्पित असून लोकप्रतिनिधी म्हणून जनताच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी व समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी पदाचा वापर करून व समाजातील सर्व घटकांना त्यांचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधी कार्यरत राहावे व विजयाचा आनंद हा सर्वसामान्य पर्यंत पोहोचून देण्यासाठी केवळ मूठभर लोकांचा विकास नव्हे तर हा समाजातील पिढीत वंचित सोबत उपेक्षित समाजाला त्यांचा हक्क मिळून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व लोकप्रतिनिधींनी कार्यरत राहून पंडित दीनदयाल उपाध्याय शामाप्रसाद मुखर्जी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी तसेच अटल बिहारी वाजपेयी नरेंद्र मोदी यांचा विचार आणि प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदर्श ग्रामव्यवस्था निर्माण केली होती त्या धरतीवर कार्य करण्याची गरज असल्याची प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष व प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.



पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती-उपसभापती

@ अकोला :

सभापती : सुलभा सोळंके : भाजप

उपसभापती : अजय शेगांवकर : वंचित

@ बार्शिटाकळी

सभापती : सुनंदा मानतकार: सेना बंडखोर.

उपसभापती : संदिप चौधरी : भाजप

@तेल्हारा :

सभापती : आम्रपाली गवारगुरू: वंचित

उपसभापती : किशोर मुंदडा : वंचित

@ बाळापूर :
सभापतीपदी : सविता टप्पे : वंचित

उपसभापती : इमरान खान : वंचित

@अकोट :

सभापती : हरदिनी वाघोडे : शिवसेना उद्धव बाळासाहेब

ठाकरे

उपसभापती : संतोष शिवरकर : भाजप

@मूर्तिजापूर :

सभापती : आम्रपाली तायडे : वंचित

उपसभापती : देवाशिष भटकर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या