नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांची तत्परता
बाजारपेठेत पायी पेट्रोलिंग, चोरीचे व अनुचित प्रकार टळले
अकोला: दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा मोठ्या प्रमाणात फुलल्या असल्याने नागरिक, महिला, युवतीच्या सुरक्षिततेसाठी व कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी शहर वाहतूक शाखा व पोलिस प्रशासनाच्या वतीने तत्परता दाखवीत नागरिकांना सुरक्षा प्रदान केली. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार, चोरीच्या घटना न घडता नागरिकांना दिवाळी उत्सवची खरेदी करणे सोयीचे झाले.
दिवाळी उत्सव सणानिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. दिवाळीनिमित्त बाजारपेठेत व गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व नागरिकांना सुरक्षित खरेदी करता यावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या पुढाकारात विविध चौकात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फतेह चौक ते खुले नाट्यगृह, तहसील ते सिटी कोतवाली, टिळक रोड, गांधी रोड ते ताजना पेठ मुख्य बाजारपेठ, भाजीबाजार, बसस्थानक, खदान परिसर, गौरक्षण रोड, जठारपेठ ते उमरी, सातव चौक, फटाका मार्केट परिसर परिसरात शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील व वाहतूक पोलिसांनी बाजारपेठेत व गर्दीच्या ठिकाणी पायी पेट्रोलिंग करण्यात आले. तसवच विविध ठिकाणी भेटी देत नागरिकांच्या समस्या व अडचणीची सोडवणूक करीत त्यांना सहकार्य करण्यात आले. त्यामुळे बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी दागिने, मंगळसूत्र, मोबाईल, पर्स, सोने चांदी, पैसे व इतर साहित्याची चोरी न होता व कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता महिला, युवती नागरिकांना सहजतेने खरेदी करता येणे शक्य झाले. पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल नागरिकांनी त्यांचे कौतुक करत आभारही मानले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या