Ticker

6/recent/ticker-posts

अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित ने राखला गड, सम्राट अशोक वाटिका मध्ये अध्यक्ष उपाध्यक्षांनी केले पुजन करून कार्याची सुरवात

अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित ने राखला गड, सम्राट अशोक वाटिका मध्ये अध्यक्ष उपाध्यक्षांनी केले पुजन करून कार्याची सुरवात



पुढील अडीच वर्षासाठी अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडणूक निकालामध्ये वंचित ने आपला गड राखला अध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्हीही पदे वंचित ने काबीज करून एक नवा इतिहास रचविला या विजयाचा जल्लोष जिल्हा परिषद प्रांगणापासुन सम्राट अशोक वाटीका येथे पर्यंत वाजत गाजत करण्यात आला. सम्राट अशोक वाटिकेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण व पूजन करून मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात आला यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण सदैव तत्पर असू असे जाहीर केले.


जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी पार पडली. ५३ सदस्यीय जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी २७ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक होती. त्यामध्ये सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या वंचित बहुजन आघाडीकडे २५ सदस्यांचे संख्याबळ होते तरी, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणखी दोन सदस्याचे पाठबळ आवश्यक होते. तसेच २३ सदस्यसंख्या असलेल्या महाविकास आघाडीला आणखी चार सदस्यांचे पाठबळ लागणार होते. यातच अकोला जिल्हा परिषदेत ऐड. प्रकाश आंबेडकर यांनी आपली सत्ता राखली, जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता कायम असुन, पुढील अडीच वर्षासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली, भाजपचे सदस्य गैरहजर राहिल्याने वंचितच्या विजयाचा मार्ग सुकर झाला, जिल्हा परिषदेत भाजपचे पाच सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष पदी संगीता अढाऊ तर उपाध्यक्ष पदी सुनील फाटकर यांची निवड झाली आहे. आजा विजयाचा जल्लोष जिल्हा परिषद कार्यालयासमोर मोठ्या हर्षउल्हासात करण्यात आला.



जिल्हा परिषदेतील पक्षीय आकडेवारी-

वंचित बहुजन आघाडी (अपक्षासह): 25

शिवसेना : 12

भाजप : 05

काँग्रेस : 04

राष्ट्रवादी : 04

प्रहार : 01

अपक्ष : 02

एकूण- 53


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या