किरण बकाले ला बडतर्फ करा, अन्यथा आमरण उपोषण - मराठा महासंघ महिला आघाडीने दिला तीव्र आंदोलनाचा इशारा
अकोला : मराठा समाजाच्या महिलांबद्दल बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी किरण बकाले यांस त्वरित पोलीस सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात येऊन त्यास अटक करण्यात यावी यासाठी आज अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला जिल्हा महिला आघाडीचे वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना पुन्हा निवेदन देण्यात आले. या संदर्भात दि. 16 सप्टेंबर 22 रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर मराठा महासंघाचे वतीने निदर्शने करुन निवेदन देण्यात आले होते.
अद्यापपावेतो शासन स्तरावर कुठलीही दखल घेतली गेली नसल्याने आज पुन्हा निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला. येत्या दोन दिवसात बडतर्फीची कारवाई न झाल्यास 14/10/2022 पासून अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधकारी कार्यालयसमोर उपोषनास बसतील असे महिला आघाडी तर्फे निवेदनात इशारा देण्यात आला आहे. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे, महिला आघाडीच्या विभागीय अध्यक्षा प्रा. अनुजाताई सावळे, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनात *अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्षा सौ.अनुराधा ठाकरे यांच्या नेतृत्वात ज्योतीताई कुकडे- जिल्हा सरचिटणीस, कल्पना बिडवे- महानगर अध्यक्षा,सिंधूताई पवार-जिल्हा संघटक, मनीषा शिंदे -अकोला पश्चिम अध्यक्षा, वैशाली कदम-महानगर उपाध्यक्षा व प्रविणभाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत सदर निवेदन देण्यात आले असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन पाटील गोमासे यांनी म्हटले.
0 टिप्पण्या