न्यू इंग्लिश हायस्कूल, अकोला येथे वाचन प्रेरणा दिन व पालक सभा संपन्न
आज दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल,अकोला येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त 2022-23 सत्रातील पालक सभा संपन्न झाली. सुरुवातीला डाॅ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री मुनशी सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन शाळेचे माजी विद्यार्थी श्री शेखर जोशी ,उपमुख्याध्यापक श्री रेलकर सर,पर्यवेक्षक श्री देविकर सर,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री सचिन बोदीले सर उपस्थित होते.
कार्यक्रमात शाळेचा विद्यार्थी सिद्धांत ढगे याने शाळेच्या ग्रंथालयात 4 पुस्तके भेट दिली.शालांत परिक्षेकरीता उपस्थितांना आवेदनपत्रे अचूक भरणे,कॉपीमुक्त अभियान,गैर मार्गाशी लढा,इ बाबत माहिती श्री रत्नपारखी सरांनी दिली. वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कु मुंढे मॅडम ,श्री घोगले सरांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या प्रगतीचा आढावा श्री रेलकर सर,श्री देविकर सरांनी पालकांना करुन दिला. विद्यार्थी हीत व परीक्षेची तयारी करण्यासाठी पालकांची भूमिका कशी असावी याबाबतचे मार्गदर्शन आपल्या भाषणातून श्री मुनशी सरांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कु मुंढे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्री रत्नपारखी सरांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल बुरघाटे मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या