संघटन कौशल्याच्या बळावर अकोल्यात बसपा किंगमेकर ठरेल-अँड.संदीप ताजने
अकोला --संघटन कौशल्य, मान्यवर कांशीराम यांची राजकीय विचारधारा आणि बहन सुश्री मायावती यांच्या नेतृत्वावर असलेल्या खंबीर विश्वासाच्या बळावर अकोला जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टी 'किंगमेकर'च्या भूमिकेत दिसेल, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
अकोला येथे ‘होवू शकत है’ राज्यस्तरीय ‘शासक बनो’ कार्यकर्ता प्रशिक्षण अभियान निमित्त आयोजित कार्यक्रमातून कॅडरला संबोधित करतांना त्यांनी पक्ष संघटन, पक्ष विस्तार आणि वैचारिक भूमिका मांडत निवडणुकीसाठी सर्वस्वी तयार राहण्याचे आवाहन केले. यावेळी प्रदेश प्रभारी प्रमोद रैना प्रामुख्याने विचारपीठावर उपस्थित होते. बीएसपी अकोल्यातही स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. जिल्ह्यात पार्टीचा जनाधार वृद्धिंगत झाला आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर समाजाला तयार करायचे आहे. जाती आणि वर्गव्यवस्थेला हद्दपार करण्याचा वसा पक्षाने घेतला आहे. याच उद्दिष्ट प्राप्तीसाठी आगामी निवडणुकीत मतदारांची पहिली पसंत बसपा असेल, असा विश्वास यावेळी अँड.ताजने यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यासह राज्यातील बळीराजाला 'अन्नदाता' आणि 'ऊर्जादाता' बनवण्यासाठी पक्षाचा प्रत्येक कॅडर मेहनत घेत आहे. पक्षासाठी समाजकार्याला वाहून घेणाऱ्या प्रत्येक कॅडरच्या मेहनतीला सलाम करीत याच प्रेम आणि विश्वासावर पक्ष भविष्यात ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ समाजव्यवस्था उभी करण्यात यशस्वी होईल,अशी भावनाही व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव विजय येलकर ,अविनाश वानखडे अकोला जिल्हाध्यक्ष रमेश इंगळे, जिल्हाप्रभारी प्रा.व्ही.आर.कांबळे, प्रभारी डाॅ.धनंजय नालट, उपाध्यक्ष अँड.चंद्रकांत वानखेडे, बाळासाहेब ढोके, महासचिव संघपाल सिरसाट, सचिव विरेंद्र सिरसाट, जिल्हा संघटक प्रविण गोपनारायण, कोषाध्यक्ष वामनराव सरकटे तसेच सर्व विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पण्या