सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.अमोल वासुदेवराव गावंडे आचार्य पदवीने सन्मानित
अकोला: सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,अकोला. येथील संगीत विभागातील प्रा.अमोल वासुदेवराव गावंडे यांना राजस्थान येथील श्री. जगदीशप्रसाद झाबरमल टिबरेवाला विश्वविद्यालय, झुंझुनू. द्वारा नुकतीच आचार्य (पिएच.डी.) पदवी प्राप्त झाली आहे त्यांनी संगीत विषयांमध्ये "डॉ. अश्विनी भिड़े-देशपांडे रचित रागरचनांजलि ग्रंथ के प्रथम खंड की चुनिंदा बंदिशों का सांगितिक अध्ययन" या विषयावर आपले संशोधन कार्य पूर्ण केले असून त्यांना श्री. जगदीशप्रसाद झाबरमल टिबरेवाला विश्वविद्यालय, झुंझुनू. राजस्थानने दिनांक ३ ऑगस्ट २०२२ रोजी आचार्य पदवीने सन्मानित केले आहे.
त्यांच्या या शोध प्रबंधासाठी श्री. जेजेटीयू, झुंझुनू,राजस्थानचे मुख्य गाईड डॉ. रंजना सक्सेना तसेच को-गाईड प्रा.डॉ.श्री. शिरीष कडू श्री. शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केले. याप्रसंगी दि. बि.जे.ई. सोसायटीचे अध्यक्ष माननीय अॅड. मोतीसिंहजी मोहता, मानद सचिव श्री. पवनकुमारजी माहेश्वरी तसेच महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री. रूपचंदजी अग्रवाल व महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. राधेश्यामजी सिकची तसेच सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रा.डॉ.अमोल वासुदेवराव गावंडे यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील, सर्व गुरुजन वर्ग, मित्रमंडळी व सहकारी मित्रांना तसेच सर्व आप्तस्वकीयांना दिले आहे.
0 टिप्पण्या