ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वृद्धापकाळाने निधन
ब्रिटन : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II Death) यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे इंग्लंडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राजपदावर कोण विराजमान होणार याबाबतची चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, एलिझाबेथ यांच्या निधनानंतर जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ट्विट करत एलिझाबेथ यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
"२०१५ आणि २०१८ साली युक्रेन दौऱ्यावर असताना माझी महाराणी एलिझाबेथ यांच्यासोबत भेट झाली होती. मी त्यांचा प्रेमळपणा आणि दयाळूपणा कधीच विसरणार नाही. एका भेटीत महाराणी एलिझाबेथ यांनी मला, महात्मा गांधी यांनी त्यांना दिलेला रूमाल दाखवला होता. त्या नेहमी आठवणीत राहतील.” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
0 टिप्पण्या