Ticker

6/recent/ticker-posts

न्यायप्रविष्ट असलेल्या खटल्यांमध्ये सरकारच्या बाजूने युक्तीवाद करण्यासाठी अ‍ॅड. सिद्धार्थ धर्माधिकारी व अ‍ॅड. आदित्य पांडे यांची नियुक्ती

न्यायप्रविष्ट असलेल्या खटल्यांमध्ये सरकारच्या बाजूने युक्तीवाद करण्यासाठी अ‍ॅड. सिद्धार्थ धर्माधिकारी व अ‍ॅड. आदित्य पांडे यांची नियुक्ती 



अकोला,  

महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या खटल्यांमध्ये सरकारच्या बाजूने युक्तीवाद करण्यासाठी विधी व न्याय मंत्रालयाने मूळचे नागपूकर अ‍ॅड. सिद्धार्थ अभय धर्माधिकारी आणि मूळचे यवतमाळकर अ‍ॅड. आदित्य अनिरुद्ध पांडे यांची नियुक्ती केली आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यालय मंत्री व भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते नाना कुलकर्णी यांचे ते ज्येष्ठ जावई आहे.


महाराष्ट्र सरकारच्या 2 सप्टेंबर 2022 च्या अधिसूचनेद्वारा अ‍ॅड. सिद्धार्थ धर्माधिकारी यांच्यावर मुख्य सरकारी अधिवक्ताची (चीफ स्टँडिंग कौन्सिल) जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर अ‍ॅड. आदित्य पांडे यांच्यावर अ‍ॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड आणि सहायक सरकारी अधिवक्ता (स्टँडिंग कौन्सिल) या कार्यभार सोपविण्यात आला आहे. 
अ‍ॅड. सिद्धार्थ धर्माधिकारी नागपूरचे ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभय धर्माधिकारी यांचे सुपुत्र आहेत. तर अ‍ॅड. आदित्य पांडे यवतमाळचे ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध पांडे यांचे सुपुत्र आहेत. या दोन्ही नियुक्त्यांबद्दल विशेषत: विधीक्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. 
----


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या