Ticker

6/recent/ticker-posts

ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अकोला बस स्थानकावर केले आंदोलन

ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अकोला बस स्थानकावर केले आंदोलन


औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर झालेच पाहीजे, अशा घोषणा करीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अकोला बसस्थानकावर आंदोलन केले. औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात यावे, तसेच औरंगाबाद शहराचा उल्लेख असलेल्या प्रत्येक एसटी बसच्या पाटीवर छत्रपती संभाजी नगर असा उल्लेख असावा, या मागणीसाठी शिवसैनिकांनी शहरातील मुख्य बसस्थानकावर आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी बसस्थानकावर उभ्या असलेल्या औरंगाबादला जाणा-या बसवर औरंगाबाद लिहीलेल्या पाटीवर छत्रपती संभाजी नगर असे स्टिकर लावले. तसेच काही उभ्या असलेल्या औरंगाबादच्या बसेसवर यावेळी ऑईल पेन्टने छत्रपती संभाजी नगर असे लिहीण्यात आले. औरंगाबादचे नामकरण ‘छत्रपती संभाजी नगर’ झालेच पाहीजे, शिवसेना जिंदाबाद यासारख्या घोषणा शिवसैनिकांनी यावेळी दिल्या.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या