सण-उत्सव शांततेत व एकोप्याने साजरे करा- जी श्रीधर
शहर पोलिस स्टेशनमध्ये दुर्गा उत्सव मंडळ पदाधिकारी व शांतता समितीची सभा
आगामी दुर्गा उत्सव, नवरात्र उत्सव, ईद, धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने शांतता समिती व दुर्गा उत्सव मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी यांची सभा आयोजीत करण्यात आली. या सभेला अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे मार्गदर्शन मिळाले. शांततेत पार पडलेल्या गणेशोत्सवाबाबत त्यांनी आनंद व्यक्त करून अशाच शांतीपूर्ण वातावरणात दुर्गोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन व ईद हे सण साजरे करण्याचेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले. सण-उत्सव साजरे करताना प्रत्येकाने आपली विधायक भूमिका जपली पाहिजे, असे मत व्यक्त केले. सभेला शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक- जी श्रीधर अकोला
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या