Ticker

6/recent/ticker-posts

सर्वोपचार रूरूग्णालयामध्ये रुग्ण वाऱ्यावर; शिवसेनेचा 'डीन' कार्यालयात ठिय्या

सर्वोपचार रूरूग्णालयामध्ये रुग्ण वाऱ्यावर; शिवसेनेचा 'डीन' कार्यालयात ठिय्या


रुग्णांना सात दिवसांत मूलभूत सुविधा देण्याचे आश्वासन


अकोला : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर योग्यरीत्या उपचार होत नसल्यासोबतच त्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने रुग्णांना सात दिवसांच्या आत मूलभूत सुविधा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.


रुग्णालयाच्या ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, आले. अस्वच्छता व घाण पसरल्याचे चित्र पाहावयास मिळते. सर्वोपचार रुग्णालयातील विविध वार्डमध्ये अस्वच्छतेने कळस गाठला आहे. रुग्णालयातील साफसफाईच्या कामाचे मूल्यमापन करून कामात हयगय करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर रुग्णालय प्रशासन कारवाई करीत नसल्यामुळे अस्वच्छतेने कळस गाठला असून, यामुळे रुग्णालयातच साथरोगाचा फैलाव होत असल्याचा आरोप सेनेच्या वतीने करण्यात आला. यासंदर्भात अकोला शहर शिवसेनेच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. पुढील सात दिवसांत रुग्णांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिल्यानंतर सेनेच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी शहर संघटक तरुण बगेरे, माजी नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, माजी नगरसेविका मंजूषा शेळके, अनिता मिश्रा, सुनीता श्रीवास, नितीन मिश्रा, शरद तुरकर, पंकज जायले, आस्तिक चव्हाण, देवा गावंडे, नितीन ताथोड, रोशन राज, राजेश इंगळे, रूपेश ढोरे, रमेश गायकवाड, संतोष रणपिसे, गणेश बुंदेले, किरण येलवनकर, लक्ष्मण पंजाबी, सुनील दुर्गिया, संजय अग्रवाल, बबलू उके, नितीन ताकवाले, पंकज श्रीवास, संजय अण्णा, मोहन पाटील वसू, विश्वास शिरसाट यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या