गणपती विसर्जनासाठी तलाव निर्माण करण्याचा निर्णय- भाजपा
अकोला दरवर्षी प्रमाणे गणेश विसर्जन व धार्मिक भावना ,भक्ती, श्रद्धा कायम रहावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजयभाऊ धोत्रे, आमदार रणधीरभाऊ सावरकर, आमदार गोवर्धनजी शर्मा,आ.वसंतभाऊ खंडेलवाल,महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल,महापौर अर्चनाताई मसने यांच्या नेतृत्वात भाजपाचे सक्रीय पदाधिकारी नगरसेविका सौ. गितांजलीताई शेगोकार, नगरसेवक राहुल देशमुख, नगरसेवक हरीश काळे, सामाजिक कार्यकर्ते सागर शेगोकार यांच्या पुढाकाराने जठारपेठ, रामदास पेठ ,तापडीया नगर, राऊत वाडी,न्यु तापडीया नगर,खरप, तसेच प्रभाग 6 व प्रभाग क्र.3 च्या भावीकभक्तांच्या सोयीसाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, भारत विद्यालय समोर, तापडीया नगर येथे भव्य सर्व सुविधायुक्त गणपती विसर्जनासाठी तलाव निर्माण करण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांना सोयीचे व्हावे या दृष्टीने स्वखर्चाने सागर शेगोकार, हरीश काळे, राहुल देशमुख यांनी गणपती विसर्जनासाठी संगीतमय वातावरणात विधिवत पूजा स्थान व गणपती निर्माल्य साठी वेगळी व्यवस्था व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय अकोला पूर्व चे आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष रणधीर भाऊ सावरकर यांच्या नेतृत्वाखाली गणेश मूर्ती विसर्जन कुत्रिम घाट व मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य संकलन, मूर्ति पूजा व्यवस्था स्थानिक राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, भारत विद्यालय समोर, तापडिया नगर येथे ०९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुविधायुक्त निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी आपण सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
अशी विनंती सागर शेगोकार राहुल देशमुख हरीश काळे ,युवाशक्ती प्रतिष्ठान मंडळ,बुथ प्रमुख ,शक्ती केंद्रप्रमुख, पेज प्रमुख. तसेच या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे
0 टिप्पण्या