Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीबाईचे लेकिंनी दारु बंदी मागणी करीता जिल्हयात फोडली पहिली दारू हंडी

सावित्रीबाईचे लेकिंनी दारु बंदी मागणी करीता जिल्हयात फोडली पहिली दारू हंडी     

तेल्हारा

गोपाळ काल्याचे दिवशी दि.19 रोजी तेल्हारा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू मुक्ती महाअभियानचे वतीने स्रियांचे संसार उध्वस्त करणारी दारु बंदीचा कायदा महाराष्ट्रात करावा ,किराणा दुकानात वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय रद्द करावा, या मागणी करता गोपाळकाल्याचे शुभ मुहूर्तावर तेल्हारा येथे टावर चौकात शिवाजी महाराजांचे पुतळ्या समोर सावित्रीबाई लेकींनी सचिन थाटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मेळाव्यात हर्षा गेबड, मनीषा देशमुख,आशा खराटे, रंजना वानखडे माया रेवस्कर, यांनी काठी मारुन दारूची हंडी फोडो आंदोलन केले. 


तसेच दारू नको- रोजगार हवा; दारू नको- दूध डेअरी पाहिजे; दारू नको- शेतमालाचे भावाचा कायदा पाहिजे; दारू नको- शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पाहिजे; दारू नको- चांगले शिक्षण पाहिजे; आरोग्य सुविधा पाहिजेत अशा प्रकारच्या मागण्याचे फलक हाती घेउन सरकारकडे जाहिर मागणी केली; व घोषणा देण्यात आल्यात. यापूर्वीच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आकोला जिल्हाधिकारी मा.निमा अरोरा याचे मार्फत संबंधित मागण्यां बद्दल दारु मुक्ती आंदोलनाचे संयोजक भाई रजनीकांत व नाना इंगोले सह पदाधिकाय्रांनी निवेदन पाठविले आहे. त्या मागण्यांचे समर्थनार्थ व निष्क्रीय सरकारचे निषेधार्थ दारु हंडी फोडो अभियान राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात दहा व्यसनमुक्ती केंद्र काढण्यात यावेत; अवैध दारू धंद्यावर नियंत्रण करण्याकरता ग्राम सुरक्षा दल गठीत करण्यात यावेत तसेच जिल्हाधिकारी व तहसीलदाराचे अध्यक्षते खाली असलेले व्यसनमुक्त कार्यासमित्या गठित करून; त्यांच्या नियमित बैठकी घेण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे; प्रत्येक गावात अवैध दारू विक्री आहे ती बंद करण्यात यावी; आदि मागण्यांचे समर्थनार्थ दारू नको दारू हांडे फोडा आंदोलन गोकुळाष्टमीच्या दिवशी निर्णय घेण्यात आल्याप्रमाणे अकोला जिल्ह्यात गोपाळकाला दिनांक 19 पासून ते मुंबईचे विधानसभा अधिवेशन संपेपर्यंत जिल्ह्यात सार्वत्रिक दारू हंडी फोडो आंदोलन 25 ऑगस्ट पर्यंत राबवण्यात येणार आहे. 


त्याची सुरुवात दिनांक 19 ला ते्ल्हारा येथे टाॅवर चौकातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करण्यात आलेली आहे. याप्रसंगी तेल्हारा शहरातील नागरिक व सावित्रीच्या लेकी व शिवाजी महाराजांना दैवत मानणारे शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तेल्हारा तालुक्यातील गावोगाव महिला बचत गट व विद्यार्थी युवकांच्या वतीने दारू हंडे फोडो अभियान राबविण्यात येईल असे घोषित करण्यात आले. यावेळी चंद्रकांत मोरे, प्रशांत विखे, गजानन रेवस्कार; विलास भटकर; व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. असे दारु मुक्ती आंदोलनाचे संयोजक भाई रजनीकांत यांनी कळवीले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या