श्री जागेश्वर अंबिका संस्थानमध्ये नवे उपक्रम
नवीन विश्वस्त मंडळ झाले सक्रिय, संस्थानमध्ये सजावट
जुने शहरातील जागृत असलेल्या जागेश्वर अंबिका देवीच्या मंदिरात स्वातंत्र्याच्या घरोघरी तिरंगा अभियानाचा जयघोष करण्यात आला.जय हिंद चौक परिसरातील जागेश्वर अंबिका संस्थान असून स्थापना १६१९ मध्ये झाली आहे. देवीच्या या पुरातन मंदिरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होत असतो. शिवकाली असलेले हे मंदिर काळ्या दगडांपासून बांधण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात माँ अंबिका देवीची पूजा पारंपरिक पद्धतीने करण्यात येते. येथेच भगवान महादेवाचे शिवलिंग असून,श्री जागेश्वर अंबिका संस्थानमध्ये अशी सजावट करण्यात आली.
भव्य प्रवेशद्वार : जय हिंद चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरून हे मंदिर आतमध्ये आहे. त्यामुळे या मुख्य रस्त्यावर मंदिराकडे यंदा फेटाही परिधान करण्यात करण्यात आली. आला. काही दिवसांपूर्वीच नवीन विश्वस्त कार्यकारिणी मंडळ गठित करण्यात आले असून, अध्यक्ष म्हणून नाना नारायणराव वानखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून प्रवीण मधुकर अग्रवाल व राजेंद्र दामोदरशेठ नेरकर हे कामकाज पाहात आहेत. सचिव- योगेश शांडिल्य, सहसचिव गजानन रोकडे, कोषाध्यक्ष श्रीपाद पाथरकर व सहकोषाध्यक्ष शशिकांत सापधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य म्हणून अशोक मन्नालाल उंटवाल, सुभाष भिरड, मंगेश साळवीकर, कमलकिशोर वर्मा व अॅड. गोपाल चतुर्वेदी यांची निवड करण्यात आली.जाणारे प्रवेशद्वार असावे, असा विचार परिसरातील युवकांच्या मनात आला आणि प्रयत्न सुरू केले. याच ठिकाणी एका वाणिज्य संकुलचे बांधकाम करण्यात येत आहे. बांधकामाचे कंत्राट कंत्राट मिर्झा शौकत बेग यांनी घेतले आहे. प्रवेशद्वाराजवळ हे काम सुरू असल्याने द्वार उभारण्यासाठी जागा निश्चित करणे आवश्यक होते. यासाठी युवकांनी बेग यांच्याशी चर्चा केली. चर्चेच्यावेळी मीच संपूर्ण बांधकाम करून देतो, असा प्रस्ताव बेग यांनी आनंदाने ठेवला आणि युवकांनीही प्रस्तावाला होकार दिला. त्यानुसार येथे काही दिवसांपूर्वीच प्रवेशद्वार बांधण्यात आले.
0 टिप्पण्या