Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने अवैध गुटखा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या --५ लाखाचा मुद्देमाल जप्त.

जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने अवैध गुटखा विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या   --५ लाखाचा मुद्देमाल जप्त.


ब्रेकिंग न्यूज 
प्रतीनीधी- संतोष माने 
मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशन हद्दीतील सिंधी कॅम्प येथे गुटख्यावर छापा विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई ..आतापर्यंत किती रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला व कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला गेला नाही .ही कारवाई शहरात तीन ठिकाणी एका सोबत केल्याचे त्यांच्या असून मोठ्या प्रमाणात गुटका साठ्याचा मुद्देमाल जप्त केल्याचे जनमानसात चर्चिल्या जात आहे
 मुर्तीजापुर शहरात विशेष पथकाद्वारे केलेल्या छापामार कारवाईत तीन लोकांकडून एकूण पाच लाखाच्या करीत किंमत असलेला अवैध गुटखा जप्त करण्यात आला . पुढील कारवाई मुर्तीजापुर पोलिस स्टेशनचे कर्मचारी तपास करीत आहेत


     सर्वत्र अवैध गुटखा विक्रीवर बंदी असताना मुर्तीजापुर शहरात मात्र गुटका विकल्या जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाल्यावरून आज दि.६ रोजी मूर्तिजापूर येथे प्रतिबंधित अवैद्य गुटका बाळगून विक्री करताना पाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत  यांच्या आदेशानुसार विशेष पथक मूर्तिजापूर येथे अवैध धंद्यांवर रेड करण्या कामी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मारलं गुप्त बातमी दारकडून खात्रीलायक बातमी मिळाली की शहरात  तीन इसम आपल्या घरात अवैध रित्या गुटका बाळगुन विक्री करीत आहे तेथे धाड टाकली असता विक्की शोखत दास  सदरांग वय ३८ रा गुरुनानक नगर सिंधी कॅम्प मूर्तिजापूर हा आपल्या राहत्या घरी अवैध रित्या घुटका बाळगुन विक्री करताना मिळून आला त्याचा जवळून एकूण ६२,५२७ रू चा मुदेमाळ जप्त करण्यात आले आहे.तर भागचंद खुशिराम सुघानी वय ५२ रा गुरुनानक नगर सिंधी कॅम्प मूर्तिजापूर हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या घुटका बाळगुन विक्री करताना मिळून आला त्याचा जवळून एकूण १,३७,१२१   रू चा मुदेमाळ जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे भूपेंद्रसिंह देविसिंग बैस वय ३८ रा माळीपुरा ग्राम सिरसो हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या गुटका बाळगुन विक्री करताना मिळून आला त्याचा जवळून एकूण ३,००,०००   रू चा मुदेमाल जप्त करण्यात आले आहे. असा एकूण तीन आरोपींना अटक करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र गुटका बंदी कायद्या अन्वेय गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून एकूण ४,९९,६४८ रू चा मुदेमाळ जप्त करण्यात आला आहे*


*सदर कारवाही मा पोलिस अधीक्षक जी श्रीधर सर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने मूर्तिजापुर मध्ये  केली*

*यापूर्वीसुद्धा शहरात लाखोनी गुटखा छापामार कारवाई विशेष पथकाद्वारे करण्यात आली दिनांक 6 जून 2022 रोजी पोलीस अधीक्षक श्री. जी .श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने छापा मारून कारवाई करून पाच लाखाच्या जवळपास मुद्देमाल जप्त केला ..यावरून असे निष्पक्ष होते की मूर्तिजापूर तालुक्यात अवैध गुटका माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे तरी मुर्तीजापुर पोलीस प्रशासन निद्रिस्तेने बघ्याची भूमिका निभावताना दिसतात ..*


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या