पाणी भरण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर टँकरसह विहीरीत कोसळला
ब्रेकींग
माझोड ता.जी.अकोला येथील शेतातील विहरीवर पाणी भरण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर टॅंकरसह व चालकासह विहीरीत कोसळला. घटनास्थळी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे टीमसह रवाना.
अकोला जिल्ह्यातील माझोड ता. पातुर येथील शेतातील विहीरीवर पाणी भरण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर टँकरसह विहीरीत कोसळला, ड्रायव्हर बाबत नेमकी माहिती मिळाली नसून घटनास्थळी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे टीमसह रवाना झाले असून घटनास्थळी पातुर पोलीस सुद्धा दाखलझाल्याची माहिती संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे. सदर विहीर 70 फुट खोल आणी 20 फुट खोल पाणी असल्याची माहिती मिळत आहे.
0 टिप्पण्या