वाघाचा मृत्यू झाला कसा?
नखास शिवार, ग्रामपंचायत पातुर नंदापुर, वन विभाग, जिल्हा- अकोला. वाघ असल्याची माहिती शेतकऱ्यांनी केली असता चौकशी का केली नाही?
पातुर नंदापूर शिवारा मध्ये चार शेळ्या वाघाने फस्त केल्याची बातमी वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा आली तेव्हा चौकशी का केली नाही? अकोला जिल्ह्यातील पातुर नंदापुर शिवारात पट्टेदार वाघ आज सकाळी मृतावस्थेत आढळल्यानं आजु-बाजुच्या गावात प्रचंड खळबळ झाल्याचं पहायला मिळालं. या परिसरात वाघ असल्याची माहीती काही आठवड्यापूर्वी वन विभागाला देण्यात आली होती. मात्र अखेर आज सकाळच्या सुमारास वाघ मृतावस्थेत आढळला.
पातुर नंदापुर वरून जवळच असलेल्या सोनखास शिवारामध्ये पिंजर वनविभागाच्या अंतर्गत जंगलामध्ये मरण पावलेला वाघ काही शेतकऱ्यांना दिसला ही बातमी वाऱ्यासारखी आजूबाजूच्या गावामध्ये पोचली असता गावकऱ्यांची एकच पाहण्यासाठी झुंबड उडाली
दि.२८ जून रोजी सकाळी१० वाजेच्या दरम्यान शेतकऱ्यांना मृता अवस्थेत वाघ दिसला तीच बातमी सोनखास या गावांमध्ये पोचली असता गावातील प्रत्येक नागरिकांनी वन विभागाला फोन केला. वन विभागाचे अधिकारी व पिंजर पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कित्येक दिवसापासून पातुर नंदापूर, बोरगाव खुर्द , सोनखास, मोझरी खुर्द, या जंगलामध्ये हा वाघ वावरत होता.
मागील आठवड्यात चार शेळ्या या वाघाने फस्त केल्या होत्या. या संदर्भात स्थानिक वृत्तपत्रात बातम्या सुद्धा प्रकाशीत केल्या होत्या. वन विभागाला याची माहिती सुद्धा दिली होती. परंतु वनविभागाने कामचुकारपणा केल्यामुळे या वाघाची पाहणी केली नाही. वाघाच्या मृत्यूचे कारण सध्या संशयाच्या भोवऱ्यातआहे.
पंचवीस ते तीस वर्षाचा असलेला हा वाघ आजारी असल्यामुळे.किंवा भुकमरी मुळे याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
या वाघाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे भीतीचे वातावरण जरी संपले असले तरी या मृत वाघाचं गांभीर्याचं काय? अशा विविध प्रश्नांनी सद्या तोंड वर काढलय.
घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी.पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार घटनास्थळी येवून पंचनामा करून वाघाला पशुवैद्यकीय शासकीय दवाखाना येथे शवविच्छेदन प्रक्रीये करत रवाना करण्यात आले. पुढील चौकशी वन विभागाचे अधिकारी करीत आहे.
,,, हा वाघ वयस्कर असल्यामुळे
आजारी असू शकतो. आजारी असेल तर त्याला खायला काही मिळाले नसेल हेसुद्धा मृत्यूचे कारण असू शकते परंतु पीएम झाल्यानंतर वाघाचे मृत्यूचे कारण समजू शकेल तोपर्यंत काही सांगता येणार नाही.
डांगे सर,
वनपरिक्षेत्राधिकारी अकोला.
---संतोष माने, प्रतिनिधी:-
0 टिप्पण्या