Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा स्त्री रुग्णालय अकोता च्या वैद्यकीय अधीक्षक डॉ आरती कुल्वाल यांची हकालपट्टी करण्याची मागणीयत

जिल्हा स्त्री रुग्णालय अकोता च्या वैद्यकीय अधीक्षक डॉ आरती कुल्वाल यांची हकालपट्टी करण्याची मागणीयत


परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र  चे सचिव सतिश सुभाष तेलगोटे यांनी अकोला उपजिल्हाधिकारी यांना सादर केले निवेदन. आरोग्य विभागाच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील पदभरती प्रक्रियेत शासन निर्णयांना डावलून तसेच ज्या कर्मचान्यानी कोरोना काळात आपला जीव धोक्यात टाकून सेवा दिली अश्या आरोग्य सेवकांना दुर्लक्षित करून आरोग्य उपसंचालक व जिल्हा स्त्री रुग्णालय मधील अधिकारी यांच्या नातेवाईक यांना नवीन पद भरती मध्ये नियुक्त करणे ही गंभीर बाब उघडकीस आली. वैद्यकीय अधीक्षक आरती कुलवाल हुकूमशाही मनमानी कारभार करत असून सार्वजनिक आरोग्य विभागाचा नाव खराब करीत आहेत. त्याला हॉस्पिटल मध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत, वार्ड मध्ये सफाई नाही, पिण्याचे पाणी नाही, दुर्गंधी पसरलेली आहे. आरती कुलवाल यांना अकोल्यात 15 वर्ष होत आहे. तरीही कुठली कार्यवाही होत नसून ही गंभीर बाब आहे. यांच्या विषयी अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. पण त्यांच्यावर कारवाई होत नसून, भ्रष्ट व मुजोर अधिकाऱ्यावर अजून शह देण्यात येत आहे . जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या विस्तारित आरोग्य सेवाकरिता उपसंचालक आरोग्य मंडळ कार्यालय अकोला मार्फत कंत्राटी पद्धतीवर पदभतीची प्रक्रिया राबविण्यात आली असून ही प्रक्रिया राबविण्यात येत असताना संबंधित अधिकाऱ्यांनकडून मनमानी उमेदवारांना, नातेवाईकांना पैसे घेऊन नियुक्ती दिली असल्याची शक्यता नागवरता येत नाही.


तसेच उपसंचालक आरोग्य सेवा किंवा जिल्हा स्त्री रुग्णालय यांनी कोणती जाहितारात काढली नसून डी. एस. इंटरप्राइजेस यांनी 103 कुशल व अकुशल जागा भरल्या, हा प्रश्न निर्माण होतो याचाच अर्थ की या मध्ये उपसंचालक अधिक्षक डॉ कुलवाल यांच्या मार्फत घोटाळा झाल्याचे नाकारता येत नाही. अश्या प्रकार आर्थिक अपहार करण्याचे धाडस या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी 15 वर्षपासून कार्यरत असल्यामुळे झाले आहेत. त्यामुळे सदर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच विभागीय चौकशी करून कळविण्यात यावी, अन्यथा स्वामिमानी संघटना महाराष्ट्र राज्य व रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या