जिल्हा परिषद पोट निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे!- आ रणधीर सावरकर
बोरगाव वैराळे
बाळापुर तालुक्यातील हातरुण जिल्हा परिषद सर्कलमध्ये पोट निवडणूक होणार आहे या निवडणूकीत भाजपा तर्फे राधिका पाटेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून या पोट निवडणुकीत भाजपा चा उमेदवार निवडणूक आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी राधिका पाटेकर यांचा विजय भाजपासाठी प्रतिष्ठेचा आहे तेव्हा प्रत्येकाना आपसातील मतभेद विसरून कामाला लागण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आ रणधीर सावरकर यांनी केले आहे
ते अंत्री मलकापूर येथे बुथ प्रमुखांना मार्गदर्शन करतांना बोलत होते पुढे बोलतांना ते म्हणाले की हातरुण सर्कलमध्ये पोट निवडणूक होत असून या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या राधिका पाटेकर हया आर्थिक दुष्टीने जरी कमकुवत असल्यातरी त्यांचा दांडगा जनसंपर्क त्यांना विजयापर्यत पोहचविण्याचे काम करणार आहे असे असले तरी त्यांच्या विजयाचे मताधिक्य वाढविण्यासाठी प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनती सोबत एक वेगळी युव्हरचना आखली पाहिजे भाजपा ची सर्वात मोठी शक्ती हि बुथ प्रमुख आहेत आणि बुथ प्रमुखांनी आपल्या बुथवर जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे याची खबरदारी घ्यावी बाहेरगावी असणारे आपले मतदार किती आहेत याची वेगळी यादी तयार करून ते मतदार कसे आणायची याची एक वेगळी जबाबदारी गावात असणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना द्यावी असे अमूल्य मार्गदर्शन केले
दि २० मे २२ ला भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राधिका पाटेकर यांचा उमेदवारी अर्ज बाळापुर तहसिल कार्यालयात भरण्यात येणार असून बाळापुर तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील भाजपा जिल्हाध्यक्ष आ रणधीर सावरकर यांनी यावेळी केले
या बैठकीला भाजपा नेते तेजराव थोरात, जिल्हा सरचिटणीस माधव मानकर, किसान मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरखडे विलास पोटे, तालुका अध्यक्ष अमोल साबळे,मनचितराव पोहरे,दिलीप पटोकार, गजानन खारोडे,शाम पोहरे, योगेश पटोकार, गणेश तायडे, विजय फुकट,आनंद पुंडे,मनिष वैराळे, राजेश्वर वैराळे, मुरलीधर माळी,सकावत जागिरदार,अविनाश तायडे,रामेश्वर बोर्डे, राजेश हरणे,मधुसुदन पोहरे, संदीप बोर्डे, धनंजय नेमाडे, आनंद नेमाडे, प्रकाश व्याघ्रांबरे,गजानन चौके,घनशाम बकाल,मुन्ना चव्हाण, बाळकृष्ण फुकट,प्रशांत पोहरे, दिलीप ठाकरे,महादेव नावकार,सुधाकर मोरखडे, अमोल तायडे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अमोल साबळे यांनी आभार प्रदर्शन करतांना यावेळी भाजपा च्या राधिका पाटेकर हया निश्चित विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला
0 टिप्पण्या