Ticker

6/recent/ticker-posts

संवेदनशील आमदार रणधीर भाऊ सावरकर यांची शोकाकुल कुटुंबीयांची सांत्वना भेट

संवेदनशील आमदार रणधीर भाऊ सावरकर यांची शोकाकुल कुटुंबीयांची सांत्वना भेट


अकोल्यातील भौरद येथील प्रतिक महेश गावंडे व भारती प्लॉट अकोला येथील किरण चंद्रशेखर लटकुटे दोघांचे वय 22 वर्ष, व दोघेही त्यांच्या परिवारातील एकुलते एक कुलदीपक, त्यांचे मित्रांसोबत सहलीसाठी बासर, तेलंगणा येथे गेले असता. गोदावरी नदीत अंघोळ करताना दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना अकोला पूर्व चे संवेदनशील, कार्य तत्पर आमदार रणधीरभाऊ सावरकर यांना माहीत झाल्याबरोबर त्यांनी तेथील आमदार व शासकीय यंत्रणेसोबत फोन द्वारे चर्चा करून लगेच आवश्यक त्या सूचना देऊन दोन्ही युवकांचे शव लवकरात लवकर अकोला येथे आणण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा व प्रा.डॉ.संजय खडसे कार्यालयात मार्फत पाठपुरावा केला होता.
तसेच दोन्ही परिवारावर कोसळलेल्या या दुःखाच्या प्रसंगी स्वतः दोन्ही परिवाराची सांत्वना भेट घेतली. आपल्या संवेदना व्यक्त केल्या.तसेच दोन्ही परिवाराच्या पाठीशी आपण ठाम उभे असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा सरचिटणीस माधवराव मानकर, महानगर सरचिटणीस संजय जिरापुरे, मा.नगरसेवक तुषार भिरड,सतीश ढगे, मंडळ अध्यक्ष निलेश निनोरे,ॲड.प्रविण भौरदकर,श्याम विंचनकर,रवी खेडकर,संजय तिकांडे,रवी दुतोंडे, श्रीकृष्ण कोल्हे आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या