Ticker

6/recent/ticker-posts

मज्जीदसमोर हनुमान चालीसा पठनाला आरपीआयचा विरोध

मज्जीदसमोर हनुमान चालीसा पठनाला आरपीआयचा विरोध 


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे जे. पी. सावंग अकोला जिल्हा महासचिव यांच्यातर्फे आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मज्जीदसमोर हनुमान चालीसा पठनाचा जो कार्यक्रम जाहिर केला आहे त्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विरोध असून फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात गुण्यागोविंदाने येथील नागरिक जीवन जगत असतांना असे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तीव्र शब्दात जाहिर निषेध, धिक्कार करीत आहे. नुकतेच मागील दोन वर्षापासून देशातील गरीब जनता कोरानामुळे त्रस्त झालेली असतांना आता कुठे जनजीवन सुरळीत सुरू आहे. अशा परिस्थितीत मनसे कडून जाती जातीत दंगल घडविण्याचा त्यांचा मानस आहे. आपण महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने त्वरीत नियंत्रण घालणे गरजेचे आहे. या करिता 
आज मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्फत आपणांपर्यंत पोहचविण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. यावडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जे.पी. सावंग जिल्हा महासचिव तसेच जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्मानंद प्रधान, बुद्धभूषण गोपनारायण, जुगलकिशोर जामणीक, देवा वानखडे व सत्यदीप इंगोले आदी पदाधिकारी उपस्थित होते.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या