अकोला जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
न्यू इंग्लिश हायस्कूल ,अकोला येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
न्यू इंग्लिश हायस्कूल ,अकोला येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी अकोला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. श्री भाऊसाहेब मांडवगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अकोला एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष श्री विलासराव देशपांडे ,उपाध्यक्ष ॲड. गिरीश देशपांडे ,सचिव प्रा.अमरावतीकर सर, सह सचिव श्री सचिन अमीन सह संस्थेचे सर्व पदाधिकारी ,सदस्य व सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
महाराष्ट्र घडविण्यासाठी अनेक थोर पुरुषांचे योगदान कदापि विसरून चालणार नाही तसेच अखंड महाराष्ट्र राहण्याकरिता सर्व नागरिकांनी जागरूक राहून कार्य केले पाहिजे .
कोरोना काळात मानव जातीची परीक्षा पाहणारी परिस्थिती आपण सर्वांनी अनुभवली असून विद्यार्थ्यांच्या गोंगाटाने दुमदुमून जाणारी शाळा, शाळेचे क्रीडांगण ,शाळेची प्रयोग शाळा, ग्रंथालय सह सर्व परिसर विद्यार्थ्यांअभावी ओस पडल्याचे चित्र आपण अनुभवले असून त्यावर मात करीत तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाइन शिक्षण अखंडपणे सुरू ठेवले त्या बद्दल समस्त शिक्षक वर्गाचे व पालकांनी दाखविलेल्या विश्वासाचे कौतुक अध्यक्षीय भाषणातून प्रा.मांडवगणे सरांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन क्रिडा शिक्षक श्री उदय हातवळणे यांनी तर आभार प्रदर्शन न्यू इंग्लिश हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री माधव मुन्शी सरांनी केले. संविधानाचे वाचन श्री मिलिंद घोगले सरांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक अकोला जिल्हा कार्यालय व अकोल्यातील अनेक गावा गावत घरावर झेंडावदन करतानाचे क्षणचित्र...!
भाकप आयटकच्या ४७२ कार्यकर्त्यानी आपल्या घरावर लाल बावटा फड़कविला
आज जागतिक कामगार दिन आणि संयुक्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार युनियन पक्ष कार्यालयावर भाकप व आयटकचे सचिव कॉ. रमेश गायकवाड यांच्या हस्ते झेंडावन्दन करण्यात आले सकाळी ९.३० वा. जुने शहर स्थित भाकप आयटक जिल्हा कार्यालयात करण्यात आले.! भाकप जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज १ मे रोजी सकाळी ठीक ८ ते १० दरम्यान आपापल्या घरांवर लाल झेंडा फडकवून लाल झेंड्याना सलामी देवुन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झालेल्या शहिदांना अभिवादन कॉ. रमेश गायकवाड जगातील जनतेला या कोरोना विषाणुशी व पोटच्या आगिशी तसेच नवीन पास झालेले अन्याय कारक कामगार कायद्ये विरोधात एकत्र लढण्याचा संदेश दिला आहे.!
जागतिक कामगार दिन आणि संयुक्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कष्टकरी यांना न्याय देणारे वक्तिमत्व यांचा जाहिर सत्कार करण्यात आला सत्कार मुर्ति
१. मा. शांताराम मोरे साहेब, माथाडी मंडळ माजी निरीक्षक,
२. कॉम्रेड विद्याधर ढोरे, कृषी विद्यापीठ कामगार युनियन
३. कॉम्रेड सुहास अग्निहोत्री, कृषी विद्यापीठ कामगार युनियन
४. कॉम्रेड कुरुमदास गायकवाड कृषी विद्यापीठ कामगार युनियन
५. कॉम्रेड रमेश गुहे कृषी विद्यापीठ कामगार युनियन
यांनी आप आपल्या परीने अनेक तळागळातील कामगारांना न्याय मिळवून देवुन त्यांचे जीवन मान उंचाक करिता फार हाल सहन करुण न्याय मिळवून दिल्या म्हणुन त्यांचा आज सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ. रमेश गायकवाड, कॉ. रामचंद्र, कॉ. नयन गायकवाड़, कॉ. ज्योती ताथोड, कॉ. सुरेखा ठोसर, कॉ. त्रिवेनी मानवटकर, यांचे स्वागत करण्यात आले.!
भाकप व आयटक जिल्हा सचिव कॉ. रमेश गायकवाड आयटक जिल्हा अध्यक्ष कॉ. एस. एन. सोनोने, कॉ. भा.ना. लांडे गुरूजी, कॉ. सुनीता पाटिल आयटक अंगणवाडी युनियन, कॉ. नयन गायकवाड आयटक राज्य कौंसिल सदस्य, कॉ. सुहास अग्निहोत्री, कॉ. कुरुमदास गायकवाड, कॉ. विद्याधर ढोरे, कॉ. रमेश गुहे, कृषी विद्यापीठ युनियन कॉ. मायावती बोरकर, आयटक आशा संघटना, कॉ. सुरेखा ठोसर, कॉ. सरोजताई मुर्तिजापुरकर, कॉ. त्रिवेनीताई मानवटकर, कॉ. महानंदा ढोक, कॉ. ज्योति ताथोड, कॉ. कल्पना महल्ले,कॉ. आशा जामने, मीरा खानिवाले, किरण तेलगोटे, आशाताई गावंडे, शीतल खुमकर, कल्पना जाधव, कॉ. रामदास ठाकरे, कॉ. अनंत सिरसाट, सुनीता वानखडे, सविता पिंपळे, वनमाला चांभारे, चंद्रकला शिंदे, कॉ. राजु धोटे, कॉ. विनायक काळे, कॉ. मनोज अग्रवाल, कॉ. सोहनलाल वर्मा, औधोगिक कामगार, कॉ. सुमीत गायकवाड, मीरा ढगेकर, प्रमीला कोकने, माया पाटिल, पंचफुला पुंडगे, कविता भोवते, मीरा ढगेकर, अरुणा इंगळे, प्रीती इंगळे, अरुणा थोरात, छाया बोबडे, शोभा पारदी, रेखा बेंड़े, राजकन्या बनसोड, मंगलाताई सह शेकडो अंगणवाडी कर्मचारी, आशा, सिटीबस, औद्योगिक कामगार, यांनी झेंडा फड़कवून कॉ. रमेश गायकवाड यांनी कामगार कर्मचारी यांना आपल्या परिवारासह नागरिकांना संदेश दिला की शिकागो शहरातील कामगारांनी ८ तासांचा कामाचा दिवस या मागणीसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मृतिनिमित जगभर १ मे रोजी कामगार दिन साजरा केला जातो. तसेच १०५ कामगार, शेतकऱ्यांच्या लढ्यातून साकारला गेलेल्या संयुक्त महाराष्ट्राचा स्थापना दिन १ मे साजरा करण्यात येतो म्हणुन मरण पत्कारुण हक्काने मिळवून घेतलेले कामगार कायद्ये NDA मोदी सरकार यांनी रद्द करुण अन्याय केलेले ४ लेबर कोड कायदे पास केले ते या विरोधात प्रखर लढा उभा करा तन, मन, धनाने लढ़ा लढुन आपल्या मागण्या मान्य करुण घेवु या..! कॉ. नयन गायकवाड यांनी 'सद्यस्थितीत कामगार चळवळीपुढील आव्हाने' संबोधित करताना म्हणाले की भारत सरकारला कोरोना व रोजगार करिता नियोजन शून्य कारभारा फटका या देशातील कामगार शेतकरी सर्वसामान्य जणता मृत्युमुखी पडली व त्यांचे अठोनाथ नुकसान झाले आहे नुकसान हेतुपुरस्पर पने करण्यात आले की काय प्रश्न उठावला कामगार शेतकरी सर्व सामान्य जनतेने समोर बेरोजगारी अवैद्य काम बंदी ज्या भावात मालक म्हनेल त्या भावात काम करने इत्या. आव्हान सोबत हे सरकार काय इंग्रजान सारखी तोडा फोड़ा आणि राज्य करन्याच्या मनस्थित आहे.! असे आपल्या प्रसिद्ध पत्रक व वाहिनिस कॉ. पी.डी. ठाकरे, यांनी कळविले आहे.!
प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो बढे येथे दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन साजरा
प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो बढे येथे दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला असून त्याप्रसंगी जि प सदस्य मा श्री सुशांत बोर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडला असून सदर कार्यक्रमाला प्रा आ केंद्र पळसो येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विपिन जाधव राजेश राऊत( सरपंच )विनोद अंबुसकर (मा जिल्हाअध्यक्ष) दीपक भाऊ गवई (वंचित बहुजन आघाडी) तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर ढेकळे श्री खडसे श्रीमती सविता केदार श्रीमती मोरेकर श्रीमती बारस्कर श्री मंगळे श्री उमेश गौड श्री अनुकूल ठाकरे श्री इंगळे श्री मस्के श्री गिरे श्रीमती लक्ष्मी व सर्व आशा हे उपस्थित होते
0 टिप्पण्या