Ticker

6/recent/ticker-posts

वृक्ष लागवडीच्‍या माध्‍यमातुन वसुंधरा मातेचे ऋण फेडूया – आमदार सावरकर

वृक्ष लागवडीच्‍या माध्‍यमातुन वसुंधरा मातेचे ऋण फेडूया – आमदार सावरकर



वृक्ष लावणे व त्‍याची जोपासना करणे हे ईश्‍वरीय कार्य आहे. पर्यावरण संवर्धन तसेच नैसर्गिक आपत्‍तींपासून रक्षण यासाठी वृक्ष लागवड अत्‍यंत आवश्‍यक आहे. धन या जन्‍माच्‍या शेवटच्‍या क्षणापर्यंत कामी येईल तर वन पुढच्‍या जन्‍माच्‍या सुरूवातीपासून कामी येईल. ज्‍या प्रमाणे जन्‍मदात्‍या आईचे ऋण आम्‍ही कधिही फेडू शकत नाही, मात्र वसुंधरा मातेचे ऋण आपण वृक्ष लागवड करून व त्‍याची जोपासणा करून फेडू शकतो. ईश्‍वरीय कार्य असून महाराष्ट्राच्या विकासामध्ये कार्य करणाऱ्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून व कामगारांचा सन्मान करून महाराष्ट्र निर्माणात बलिदान देणार्‍यांचे अभिवादन करणे कर्तव्य असल्याचे कामगार शेतकरी यांचा भारताला सुजलाम् करण्यात महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन तसेच उद्योजक व समाजातील सर्व घटकांचा देश निर्माणात योगदान व महाराष्ट्राला प्रगतिशील कडे नेण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा असे आवाहन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, यांनी केले.


दिनांक १ मे आयोजित समारोहात आ. रणधीर सावरकर बोलत होते. यावेळी तहसीलदार तहसीलदार तलाठी तालुका अकोला तालुक्यातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते बोलताना आ. सावरकर पुढे म्‍हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुघीर मुनगंटीवार वनमंत्री असताना तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्‍प जाहीर केला होता. लोकसहभागातुन हा संकल्‍प आम्‍ही पूर्ण केला. महाराष्‍ट्रात विक्रमी वृक्ष लागवड या काळात झाली. १८२० पासून औद्योगिक क्रांती सुरू झाली व तिथून वृक्षतोड सुरू झाली. ग्‍लोबल वार्मींग, क्‍लाईमेंट चेंज हे सर्व शब्‍द आता नित्‍याचे झाले आहे. पूर्वी मॅन ईज सोशल अॅनिमल असे म्‍हटले जायचे. मात्र आज हा प्रवास मॅन इज सेल्‍फिश अॅनिमल असा सुरू आहे. जिथे प्राणवायु आहे तिथे जीवन आहे. संयुक्‍त राष्‍ट्र संघात देखील आता पर कॅपिटा इनकम ऐवजी हॅप्‍पीनेस इंडेक्‍स बद्दल बोलले जाते. गायत्री परिवार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार विविध सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण संवर्धनाचे ईश्‍वरीय कार्य सुरू आहे यासाठी मी त्‍यांचे अभिनंदन करतो असेही आ. रणधीर सावरकर यावेळी बोलताना म्‍हणाले.


   जाहीरात व बातमीसाठी संपर्क 9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या